Car Loan : देशातील बँका, फायनान्स कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सणासुदीच्या दिवसांमध्ये विशेष ऑफर सुरू करत असतात. बँका तसेच वित्तीय संस्था कमीत कमी व्याजदरात ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देत आहेत. बँकांकडून कार खरेदी करण्यासाठी देखील कमीत कमी इंटरेस्ट रेटवर ग्राहकांना कार लोन पुरवले जात आहे.
दरम्यान आज आम्ही हप्त्यावर नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत. सप्टेंबर महिन्यात केंद्रातील मोदी सरकारने जीएसटी 2.0 ची अंमलबजावणी सुरू केली. या अंतर्गत अनेक वस्तूंवरील जीएसटी मध्ये कपात झाली.

छोट्या वाहनांवरील जीएसटी देखील सरकारने कमी केला आणि यामुळे वाहनांच्या किमती प्रचंड कमी झाल्या आहेत. साहजिकच किमती कमी झाल्यामुळे खरेदी वाढली आहे आणि यामुळे ऑटो क्षेत्राला सर्वाधिक फायदा होतोय. दिवाळीच्या आधीच सरकारच्या जीएसटी कपातीच्या धोरणामुळे वाहनांच्या किमतीत घसरण झाली आहे.
अशा स्थितीत जर तुम्हाला दिवाळीत नवीन कार घ्यायची असेल आणि त्यासाठी तुम्ही कर्ज घेणार असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची ठरू शकते. कारण आज आपण कमीत कमी व्याजदरात कार लोन ऑफर करणाऱ्या पाच बँकांची माहिती पाहणार आहोत.
तसेच या टॉप 5 बँकांकडून सात लाख रुपयांचे वाहन कर्ज पाच वर्षांसाठी घेतले तर किती रुपयांचा मासिक हप्ता भरावा लागणार याचे गणित हे आज आपण या लेखातून समजून घेऊयात. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
या बँका देणार सर्वात स्वस्त वाहन कर्ज
Yes Bank – व्याजदर – 9.70%, 5 वर्षांसाठी सात लाखांचे कर्ज घेतल्यास 14 हजार 750 रुपयांचा हप्ता.
HDFC – 9.40% इंटरेस्ट रेट, 5 वर्षांसाठी सात लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास 14,646 रुपयांचा ईएमआय
ऍक्सिस – 8.80 % व्याजदर, पाच वर्षांसाठी सात लाखांचे कर्ज घेतल्यास 14 हजार 460 रुपयांचा हप्ता
ICICI – 8.50 % व्याजदर, 5 वर्षांसाठी सात लाखांचे कर्ज घेतल्यास 14 हजार 357 रुपयांचा हप्ता.
इंडसइंड – या बँकेचा व्याजदर 8.30% आहे. पाच वर्षांसाठी सात लाखांचे कर्ज घेतल्यास 14 हजार 188 रुपयांचा हप्ता भरावा लागेल.