Changes from August : प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला अनेक बदल केले जातात त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. आजपासून सुरु होणारा ऑगस्ट महिना अनेक बदल घेऊन आला आहे. दैनंदिन जीवनाशी निगडित अनेक गोष्टींमध्ये आजपासून बदल होणार आहे.
सर्वसामान्यांच्या दैनंदिन आयुष्याशी आणि व्यवहाराशी हे बदल निगडित असल्याने त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. गॅस सिलिंडरपासून ते वाहतुकीच्या नियमात बदल केले जाणार आहेत. जाणून घ्या सविस्तर.
गॅस सिलिंडरच्या किमतीत झाला मोठा बदल
आज 1 ऑगस्ट म्हणजेच नवीन महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सरकारी कंपन्यांनी व्यावसायिक स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांनी कमी केल्या आहेत. आता दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 1680 रुपये इतकी आहे.
तर कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1802.50 रुपये आहे. तर मुंबईत तो 1640.50 रुपयांना मिळत आहे. तसेच चेन्नईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1852.50 रुपये इतकी आहे.परंतु, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. एलपीजी सिलिंडरच्या किंमतींचा आढावा प्रत्येक नवीन महिन्याच्या पहिल्या तारखेला घेण्यात येतो.
आयकर रिटर्न
समजा तुम्ही 31 जुलै 2023 पर्यंत तुमचे आयकर रिटर्न भरले नाही तर आता तुम्हाला यासाठी दंड भरावा लागणार आहे. तसेच तुम्हाला दंडाशिवाय आर्थिक वर्षासाठी ITR दाखल करता येणार नाही. तुम्हाला दंडासह ३१ डिसेंबरपर्यंत तुमचा आयकर भरता येईल. आयकर विभागाच्या कलम १३९(१) अन्वये, कालमर्यादेत आयटीआर भरला नाही तर तुम्हाला कलम २३४एफ अंतर्गत ५ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. परंतु ज्यांचे उत्पन्न 5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
बँक ऑफ बडोदा चेक पेमेंट नियमांत बदल
आजपासून बँक ऑफ बडोदाने चेकशी निगडित आपले नियम बदलले आहेत. बँकेने RBI च्या निर्देशानुसार पेमेंट पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू करण्यात आली आहे. याबाबत बँकेने आपल्या ग्राहकांना माहिती देण्यात आली आहे.
बँका 14 दिवस राहणार बंद
ऑगस्ट महिन्यात साप्ताहिक सुटी शिवाय वेगवेगळ्या ठिकाणी 14 दिवस बँका बंद राहणार असल्याने जर तुमचेही बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे आणि महत्त्वाचे काम असेल तर ते वेळेवर पूर्ण करा. महत्त्वाचे म्हणजे या सुट्यांमध्ये शनिवार आणि रविवारचाही समावेश आहे.
अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड पॉइंटमध्ये महत्त्वाचा बदल
अॅक्सिस बँकेकडून कॅशबॅक आणि इन्सेंटिव्ह पॉइंट्स कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बँकेकडून वेगवेगळ्या क्रेडिट कार्ड ऑफरसाठी आपले बक्षीस कार्यक्रम, व्याज दर आणि वार्षिक शुल्क सुधारित करण्यात आले आहे.
वाहतुकीच्या नियमात बदल
आजपासून वाहतुकीशी निगडित नियमांमध्ये मोठा बदल होणार आहेत. जर तुम्ही आजपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि इन्शुरन्सशिवाय गाडी चालवली तर तुम्हाला 5-5 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. तसेच ड्रंक अँड ड्राईव्हसाठी 6 महिन्यांच्या तुरुंगवासासह आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे.