Cheapest Car Loan : सध्या नोव्हेंबर महिना अंतिम टप्प्यात पोहोचला. येत्या सहा दिवसात नवीन महिन्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान जर तुम्ही येत्या डिसेंबर महिन्यात किंवा नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत असाल विशेषता नवीन कार घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास ठरणार आहे.
खरंतर अनेक जण नव्या वर्षात नवीन कार खरेदी करतात. आता तुम्हालाही नव्या वर्षात नवीन कार घ्यायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक कामाची माहिती घेऊन आलो आहोत.

आज आम्ही तुम्हाला अशा टॉप सात बँकांची माहिती सांगणार आहोत ज्या की कमी व्याज दरात ग्राहकांना कारलोन उपलब्ध करून देत आहे. यामुळे जर तुम्हाला ईएमआयवर कार घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी.
खरे तर देशातील अनेक बँका आणि नॉन बँकिंग फायनान्शियल कंपन्या आपल्या ग्राहकांना कमीत कमी व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र जर तुम्हाला नवीन कार खरेदी करण्यासाठी लोन घ्यायचे असेल तर सर्वात कमी व्याजदरात आणि कमी शुल्कात कर्ज देणाऱ्या बँकांचा विचार करायला हवा.
या बँका देतात सर्वात कमी व्याजदरात कार लोन
स्टेट बँक ऑफ इंडिया : एसबीआय देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना 8.75% दराने कार लोन उपलब्ध करून देत आहे. तसेच कार लोनसाठी ही बँक आपल्या ग्राहकांकडून साडेसातशे ते पंधराशे रुपयांपर्यंतचे शुल्क वसूल करते.
आयडीबीआय बँक : ही सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील देशातील एक प्रमुख बँक म्हणून ओळखली जाते. ही बँक आपल्या ग्राहकांना 7.95% व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहे. ही बँक आपल्या ग्राहकांकडून प्रक्रिया शुल्क म्हणून 2500 रुपये वसूल करते.
युको बँक : ही बँक सुद्धा सार्वजनिक क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे आणि आपल्या ग्राहकांना ही बँक 7.60% ते 10.25 टक्के व्याजदरात कार लोन देते. विशेष बाब म्हणजे कार आणि इलेक्ट्रिक वाहन घेणाऱ्या ग्राहकांना कोणतेही प्रक्रिया शुल्क द्यावे लागत नाही.
युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक : या दोन्ही बँक आपल्या ग्राहकांना 7.60% ते 7.80% व्याजदर कार लोन देतात.
कॅनरा बँक : ही बँक आपल्या ग्राहकांना 7.70% व्याजदरात कार लोन उपलब्ध करून देत आहे. तसेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत या बँकेकडून कार लोन घेणाऱ्यांना प्रक्रिया शुल्क सुद्धा द्यावे लागणार नाही.













