Fixed Deposits : फिक्स्ड डिपॉझिट मधील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते, म्हणूनच भारतातील जवळ-जवळ प्रत्येक व्यक्ती येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देते. अशातच तुमचाही सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर तुम्ही खाली दिलेल्या बँकामध्ये एफडी करण्याचा विचार करू शकता, या बँका तुम्हाला सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.
FD वरील व्याजदर हा कालावधी आणि गुंतवणुकीच्या रकमेवर अवलंबून असतो. असे असूनही, वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या दराने व्याज देतात. आपण आज चार बँकांमधील 2 कोटी रुपयांपेक्षा कमी FD वर दिल्या जाणाऱ्या व्याजदराबद्दल जाणून घेणार आहोत.
कोटक महिंद्रा बँक
ही बँक 365-389 दिवसांसाठी FD वर 7.10 टक्के व्याज दर देत आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीसाठी 7.82 टक्के व्याजदर देत आहे. बँक 5-10 वर्षांच्या FD वर 6.20 टक्के दराने तर ज्येष्ठ नागरिकांसाठी, याच कालावधीसाठी 6.70 टक्के दराने व्याज देत आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया
1 वर्षापेक्षा जास्त आणि 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर बँक व्याजदर 7.10 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीसाठी 7.60 टक्के व्याजदर देत आहे. बँक 5-10 वर्षांच्या FD वर 6.50 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, याच कालावधीसाठी हा दर 7.50 टक्के आहे.
आयसीआयसीआय बँक
1 वर्षाच्या FD वर व्याज दर 6.70 टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीचा व्याज दर 7.20 टक्के आहे. ICICI बँक 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 6.90 टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, याच कालावधीसाठी हा दर 7.5 टक्के आहे.
एचडीएफसी बँक
1 वर्षापेक्षा जास्त आणि 15 महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर व्याज दर 6.60 टक्के आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याच कालावधीचा व्याज दर 7.10 टक्के आहे. बँक 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या FD वर 7.00 टक्के दराने FD वर व्याज देत आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी, त्याच कालावधीसाठी दर 7.75 टक्के आहे.