1 जानेवारी 2026 पासून Cibil Score बाबत नवीन नियम लागू होणार ! कर्ज घेणाऱ्या ग्राहकांवर काय परिणाम होणार?

Cibil Score New Rule : नव्या वर्षाच्या सुरुवातीला काही नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. नव्या वर्षात बँकेशी संबंधित काही नियम बदलले जाणार आहेत. सिबिल स्कोर बाबत देखील नव्या वर्षात नवीन नियम लागू होणार आहेत.

खरे तर नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ बाकी आहे आणि अशातच आता कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

कर्ज घेणाऱ्यांसाठी आरबीआयकडून सिबिल स्कोर च्या नियमात बदल करण्यात आला आहे. हा बदल जानेवारी 2026 पासून लागू केला जाणार असून आज आपण नेमका सिबिल स्कोर संदर्भातील कोणता नियम बदलण्यात आला आहे आणि याचा सर्वसामान्य ग्राहकांवर काय परिणाम होणार याचाच आढावा या लेखातून घेणार आहोत.

सिबिल स्कोरच्या नियमात काय बदल होणार?

रिझर्व बँक ऑफ इंडियाने नव्या वर्षाच्या आधीच मोठा निर्णय घेतलाय. नव्या निर्णयानुसार सिबिल स्कोर च्या नियमात बदल होणार आहे. महत्वाची बाब अशी की या नव्या नियमाचा फायदा कर्ज घेणाऱ्या नागरिकांना होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की आरबीआयच्या नव्या निर्णयानुसार आता सिबिल स्कोर 14 दिवसांमध्येच अपडेट होणार आहे. आधी सिबिल स्कोर जवळपास 30 ते 45 दिवसांनी अपडेट केला जात होता. पण आता सिबिल स्कोर दोन आठवड्यातच अपडेट होणार आहे आणि याचा थेट फायदा कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना होईल अशी माहिती जाणकार लोकांकडून देण्यात आली आहे.

आधी सिबिल स्कोर 30 ते 45 दिवसांनी अपडेट व्हायचा आणि यामुळे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना काही प्रकरणांमध्ये फटका बसत असे. पण आता सिबिल स्कोर लवकर अपडेट केला जाईल आणि याचा फायदा ग्राहकांना होऊ शकतो.

आरबीआयने देशभरातील तमाम बँकांना आणि एनबीएफसी कंपन्यांना नवीन निर्देश दिले आहेत. या नव्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2026 पासून महिन्यातून किमान दोनदा सिबिल, एक्सपेरियन, इक्विफॅक्स आणि सीआरआयएफ हाय मार्क सारख्या क्रेडिट ब्युरोला क्रेडिट माहिती पाठवावी लागणार आहे. आधी हे काम दर एक – दीड महिन्यांनी केले जात होते.