PPF, SSY Account Update : ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) किंवा इतर लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी आहे. येथील गुंतवणूकदारकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत त्यांच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेला भेट द्यावी लागेल. कारण त्यांच्या आधार क्रमांकाशी संबंधित माहिती द्यावी लागेल, जर ग्राहकांनी असे केले नाही तर त्यांचे खाते बंद होऊ शकते.
वित्त मंत्रालयाच्या अधिसूचनेद्वारे आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाने PPF, NSC आणि इतर लहान बचत योजनांसाठी आधार आणि पॅन अनिवार्य केले आहे. 31 मार्च 2023 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे हे सूचित करण्यात आले. या नोटीसद्वारे विद्यमान भागधारकांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता.

अधिसूचनेनुसार, जर एखाद्या ठेवीदाराने आधीच खाते उघडले असेल आणि त्याने खाते कार्यालयात आधार क्रमांक सादर केला नसेल, तर त्याला 1 एप्रिल 2023 पासून सहा महिन्यांच्या आत हे करावे लागेल. तसे न केल्यास गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होऊ शकते.
पोस्ट ऑफिसमध्ये केलेली गुंतवणूक गोठवल्यास तुम्हाला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो
-जर कोणतेही व्याज देय असेल तर ते गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा केले जाणार नाही.
-गुंतवणूकदार त्यांच्या PPF किंवा सुकन्या समृद्धी खात्यात गुंतवणूक करू शकणार नाहीत.
-गुंतवणूकदारांना त्यांच्या बँक खात्यात मॅच्युरिटी रक्कम जमा होणार नाही.
जर ठेवीदाराने सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांचा आधार क्रमांक प्रदान केला नाही, तर लेखा कार्यालयाला आधार क्रमांक प्रदान होईपर्यंत त्याचे खाते निष्क्रिय होईल.
अशा परिस्थितीत, जर तुम्ही कोणत्याही अल्पबचत योजनेत गुंतवणूक केली असेल आणि आजपर्यंत तुमचा आधार कार्ड क्रमांक सादर केला नसेल, तर तुम्ही हे काम अजिबात उशीर करू नका, लवकरात लवकर आपल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसशी संपर्क साधा.