Credit Card : क्रेडिट कार्ड धारकांसाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. खरतर, देशातील अनेक बँकांच्या माध्यमातून ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय इतरही नॉन बँकिंग ऑर्गनायझेशन आहेत जें की ग्राहकांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देत आहेत. क्रेडिट कार्ड देणाऱ्या कंपन्या आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या ऑफर्स देखील देत आहेत. या ऑफरचा उपयोग करून ग्राहकांना कमी किमतीत शॉपिंग करता येते. काही क्रेडिट कार्ड ग्राहकांना मूवी तिकीटवर ऑफर देते.
क्रेडिट कार्डचा उपयोग करून मूव्ही तिकीट खरेदी केल्यास डिस्काउंट मिळतो. एवढेच नाही तर अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या ई-कॉमर्स साइटवर काही क्रेडिट कार्डने शॉपिंग केली तर कॅशबॅक देखील मिळतो. क्रेडिट कार्डने शॉपिंग केल्यास स्वस्तात इलेक्ट्रॉनिक किंवा इतर वस्तू खरेदी करता येतात. स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा इत्यादी वस्तू क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास स्वस्तात मिळतात. याशिवाय काही अशाही क्रेडिट कार्ड कंपन्या आहेत ज्या आपल्या ग्राहकांना लक्झरी हॉटेलमध्ये फ्री स्टे ची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. आज आपण अशाच काही क्रेडिट कार्डची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
एसबीआय ऑरम क्रेडिट कार्ड : SBI ही सार्वजनिक क्षेत्रातील देशातील सर्वात मोठी बँक आहे. या पब्लिक सेक्टरमधील बँकेचे वेगवेगळे क्रेडिट कार्ड बाजारात पाहायला मिळतात. ऑरम क्रेडिट कार्ड अशाच विविध क्रेडिट कार्ड पैकी एक आहे. यात अनेक प्रकारच्या सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
या कार्डमध्ये लेन्सकार्ट गोल्डसह Amazon Prime, Discovery Plus चे सबस्क्रिप्शन दिले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, 40,000 रिवॉर्ड पॉइंट्सचा (सुमारे 10,000 रुपये) सामील होण्याचा लाभ देखील उपलब्ध आहे. एवढेच नाही तर या क्रेडिट कार्डचा उपयोग करून एका वर्षात 10 लाख रुपये खर्च केल्यास 10,000 रुपयांचे ताज व्हाउचर देखील मिळते.
HSBC प्रीमियर मेटल क्रेडिट कार्ड : हे एक लोकप्रिय क्रेडिट कार्ड आहे. यावर ग्राहकांना इतर क्रेडिट कार्ड प्रमाणेच अनेक फायदे मिळत आहेत. या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना वेलकम ऑफर अंतर्गत ताज हॉटेलची एपिक्युअर मेंबरशिप दिली जात आहे. याशिवाय 12,000 रुपयांचे ताज एक्सपिरियन्स गिफ्ट कार्डही दिले जात आहे. हे कार्ड वापरून बुक माय शोद्वारे तिकीट बुक केले तर तुम्हाला एका तिकिटासह दुसरे तिकीट मोफत दिले जात आहे.
या कार्डवर अनलिमिटेड एअरपोर्ट लाउंज प्रवेश देखील दिला जात आहे. या कार्डची जॉइनिंग फी 12,000 रुपये आहे आणि वार्षिक फी 20,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच जर तुमचा अधिकचा विमान प्रवास असेल आणि ताज हॉटेलमध्ये तुमचा मुक्काम राहत असेल तर तुमच्यासाठी हे कार्ड फायदेशीर ठरू शकणार आहे.
सिटी प्रेस्टिज क्रेडिट कार्ड : Citi Prestige क्रेडिट कार्ड सुद्धा एक अतिशय लोकप्रिय कार्ड आहे. अनेकजण या क्रेडिट कार्डचा वापर करत आहेत. या क्रेडिट कार्ड ची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ताज ग्रुप आणि ITC हॉटेल्समध्ये राहण्यासाठी याच्या ग्राहकांना 10,000 चा लाभ मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांनी सलग 4 दिवस हॉटेल बुक केल्यास त्यांना एक दिवस मोफत राहण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जात आहे. याशिवाय या कार्डमध्ये अनलिमिटेड लाउंज ऍक्सेस देखील देण्यात आला आहे. हे कार्ड जे नेहमी प्रवास करतात आणि ज्यांना नेहमीच हॉटेलमध्ये राहावे लागते अशांसाठी फायदेशीर ठरणार आहे.