Canara Bank : सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने आपल्या करोडो ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. बँकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ग्राहकांना आता पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेच्या कोणत्या निर्णयामुळे ग्राहकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे जाणून घ्या.
कॅनरा बँकेने नुकतीच मार्जिन कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेट्स (MCLR) मध्ये 0.05 टक्के म्हणजेच 5 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. हे नवीन दर 12 मार्च 2024 पासून लागू करण्यात आले आहेत. MCLR वाढल्यामुळे गृहकर्ज, कार कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याजदर वाढ झाली आहे. याशिवाय जुने घर आणि कार लोन घेणाऱ्यांचा ईएमआयही वाढणार आहे. बँकेच्या या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर पूर्वीपेक्षा जास्त भार पडणार आहे.
कॅनरा बँकेसाचे नवीन MCLR दर
कॅनरा बँकेचा रातोरात MCLR 8.10 टक्के वरून 8.15 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्याचा MCLR दर ८.२० टक्क्यांवरून ८.२५ टक्के झाला आहे. कॅनरा बँकेने 3 महिन्यांचा MCLR 8.30 टक्क्यांवरून 8.35 टक्के आणि 6 महिन्यांचा MCLR 8.65 टक्क्यांवरून वरून 8.7 टक्के केला आहे. 1 वर्षासाठी MCLR दर 0.05 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. हा दर 8.85 टक्क्यांवरून 8.90 टक्के पर्यंत वाढले आहेत. त्याच वेळी, 2 वर्षांचा MCLR 9.15 टक्क्यांवरून वरून 9.20 टक्के आणि 3 वर्षाचा MCLR 9.25 टक्क्यांवरू न9.3 टक्के झाला आहे.
MCLR दर अशा प्रकारे ठरवला जातो
ठेवी दर, रेपो दर, परिचालन खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखण्याची किंमत यासह MCLR ठरवताना विविध घटक विचारात घेतले जातात. रेपो दरातील बदलांचा MCLR दरावर परिणाम होतो. MCLR मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांची EMI वाढते.
या ग्राहकांना होईल परिणाम
MCLR मधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज यासह सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. आता कर्ज ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. तर नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना महागडे कर्ज मिळेल.