Saving Account : जर तुम्हीही तुमच्याकडे असलेले पैसे बचत खात्यात ठेवत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. बँकेकडून तुम्हाला बचत खात्याची सुविधा पुरवली जाते. बचत खात्यात पैसे ठवण्याचे काही नियम आहेत, जे तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला भविष्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हालाही बचत खात्याबाबत हा नियम माहित नसेल तर, तर आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. जेणेकरून भविष्यात होणाऱ्या नुकसानीला तुम्ही टाळू शकाल.
जर तुमची एकापेक्षा जास्त बँक खाती असतील तर त्यामध्ये रोख ठेवण्याची मर्यादा काय आहे हे जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हे माहित असेल तर तुम्ही आयकर टाळू शकाल. नियमांनुसार, जर तुम्ही तुमच्या बचत खात्यात ठराविक मर्यादेपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर आयकर कापला जाईल. आज आपण या मर्यादांबद्दलच जाणून घेणार आहोत.
तुम्ही एका दिवसात तुमच्या बचत खात्यात जास्तीत जास्त 1 लाख रुपये जमा करू शकता. मात्र, तुम्ही अधूनमधून रोख रक्कम जमा केल्यास ही मर्यादा अडीच लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. जोपर्यंत वार्षिक मर्यादेचा संबंध आहे, बचत खात्यात जास्तीत जास्त 10 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. जर तुम्ही या मर्यादेपेक्षा जास्त पैसे भरले तर तुम्हाला जमा केलेल्या रोख रकमेवर कर भरावा लागेल. आयकर रोख रकमेवर लावला जात नाही तर त्यावर मिळणाऱ्या व्याजावर लावला जातो.
जर बचत खात्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा झाली असेल, तर ही माहिती आयकर विभागाला देण्याची जबाबदारी बँकेची आहे. जर तुम्हाला तुमच्या बँक ठेवीवर 10,000 रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर तुम्हाला त्यावर कर भरावा लागेल.