Small cap stock : 1 रुपयाचा हा शेअर खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मारामार, कंपनीने जाहीर केला विशेष लाभांश…

Published on -

Small cap stock : बाजारात विक्री होत असताना शुक्रवारी काही पेनी स्टॉकमध्ये तुफान वाढ झाली. असाच एक शेअर म्हणजे स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेड. शुक्रवारी या शेअरची किंमत 4 टक्के पेक्षा जास्त वाढली आणि 1.98 वर बंद झाली. ट्रेडिंग दरम्यान शेअर 1.99 रुपयांवर पोहोचला. तुमच्या माहितीसाठी फेब्रुवारी महिन्यात शेअरची किंमत 3.52 रुपयांवर गेली होती. अस्थास्थितीत स्टॉक रिकव्हरी मोडमध्ये दिसत आहे.

अशास्थितीत गुंतवणूकदार या शेअरमध्ये गुंतवणूक करून भविष्यात चांगला परतावा कमवू शकतात. जर तुम्ही सध्या पेनी स्टॉक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. दरम्यान, कंपनी लवकरच संचालक मंडळाची बैठक घेणार आहेत, या बैठकीत ​​संचालक मंडळ पात्र भागधारकांसाठी विशेष लाभांशाचा विचार करणार आहे. तसेच नवीन शेअर्स जारी करून निधी उभारण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत विचार करून त्याला मंजुरी दिली जाऊ शकते. ही बैठक 30 एप्रिल 2024 ला होऊ शकते.

स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्स लिमिटेडचे ​​संचालक मंडळ त्यांच्या आगामी बैठकीत पात्र भागधारकांसाठी विशेष लाभांशाचा विचार आणि मंजूरी करणार आहे. नवीन शेअर्स जारी करून निधी उभारण्याच्या प्रस्तावावरही बैठकीत विचार करून त्याला मंजुरी दिली जाऊ शकते. या स्मॉल-कॅप कंपनीने स्टॉक एक्सचेंजला बोर्ड बैठकीच्या तारखेची माहिती दिली आहे. 30 एप्रिल 2024 ही बैठकीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीने सांगितले की, हा विशेष लाभांश आमच्या भागधारकांचा अतूट पाठिंबा आणि विश्वास दाखवण्यासाठी दिला जात आहे. भागधारकांची दृढ वचनबद्धता कंपनीला पुढे नेण्यात महत्त्वाची ठरली आहे. स्टँडर्ड कॅपिटल मार्केट्सने पुढे सांगितले की बैठकीत संचालक मंडळ प्राधान्य इश्यू/राइट्स इश्यू/किंवा इतर कोणत्याही पद्धतीद्वारे निधी जारी करण्यावर देखील विचार करेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe