Fixed Deposit : स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे, जिथे करोडो लोकांची बँक खाती आहेत. देशातील ही सर्वात जुनी बँक असल्याने येथे लोक अनेक प्रकारच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. अशातच जर तुम्हालाही अलीकडच्या काळात किंवा भविष्यात मुदत ठेव करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला ही बँक आपल्या ग्राहकांना मुदत ठेवींवर किती परतावा देत आहे हे सांगणार आहोत.
खरं तर, देशातील सर्वात मोठ्या बँकांच्या यादीत समाविष्ट असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अलीकडेच नवीन एफडी दर लागू केले आहेत, ज्यामध्ये बँकेने 1 वर्षांपासून कमी कालावधीच्या एफडीवरील म्हणजेच 46 दिवसांवरील दर वाढवले आहेत. बँकेने 179 दिवस, 180 दिवस ते 210 दिवस आणि 211 दिवसांचा व्याजदर 0.25 वरून 0.75 टक्के वाढवला आहे.
तुम्हाला माहितीची असेल SBI वेगवेगळ्या कालावधीची FD ऑफर करते. म्हणून, जर तुम्ही बँकेचे ग्राहक असाल, तर नवीन SBI FD व्याजदराबद्दल जाणून घेतल्यानंतरच गुंतवणूक करा, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त लाभ मिळू शकतील. लक्षात घ्या SBI ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.50 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. बँकेचे व्याजदर पुढीलप्रमाणे :-
-7 दिवस ते 45 दिवसांच्या FD वर बँक 3.50 टक्के व्याज देत आहे.
-46 दिवस ते 179 दिवसांच्या FD वर 5.50 टक्के व्याज देत आहे.
-180 दिवस ते 210 दिवसांच्या FD वर 6 टक्के व्याजदर देत आहे.
-211 दिवसांपासून ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.25 टक्के व्याजदर आहे.
-1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.80 टक्के व्याजदर आहे.
-2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 7 टक्के दर आहे.
-3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर 6.75 टक्के व्याज दर देत आहे.
-5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर 6.50 टक्के व्याजदर आहे.
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर ज्येष्ठ नागरिक FD 7.50 टक्के मिळतात. SBI ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे ते 10 वर्षे कालावधीच्या FD वर 7.5 टक्के व्याजदर देखील देत आहे.