DA Hike Update : केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात या वर्षातील पहिली DA वाढ करण्यात आलेली नाही. मात्र आता कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये लवकरच वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारकडून मोठी भेट दिली जाईल.
केंद्र सरकारकडून मार्च महिन्यापासून कर्मचाऱ्यांच्या DA चा फॉर्म्युला बदलला जाऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारात लक्षणीय वाढ केली जाण्याची शक्यता आहे. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना DA वाढीचा मोठा लाभ होणार आहे.

DA चा नवीन फॉर्म्युला
लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारकडून लाखो कर्मचारी आणि पेन्शन धारकांना मोठा लाभ दिला जाणार आहे. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA मध्ये 4 टक्के DA वाढ केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सध्या कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. जर महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जाऊ शकतो. महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर पगारात देखील वाढ होणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मार्च महिन्यात वाढ करण्यात आली तरी कर्मचाऱ्यांना याचा लाभ 1 जानेवारी 2024 पासूनच दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोन वेळा वाढ करण्यात येत असते.
जानेवारी ते जून या दरम्यान पहिली DA वाढ केली जाते तर जुलै ते डिसेंबर यादरम्यान दुसरी DA वाढ केली जात असते. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्याचा मोठा फायदा होत असतो.
इतका वाढणार पगार
एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 30,000 रुपये असेल आणि DA मध्ये 4 टक्के वाढ झाली तर त्याला पगारात 1,200 रुपयांची वाढ मिळेल. केंद्र सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या DA वाढीसोबतच त्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये देखील वाढ केली जाऊ शकते. सध्या कर्मचाऱ्यांना 2.60 फिटमेंट फॅक्टर दिला जात आहे. जर यामध्ये वाढ झाली तर कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर 3.0 होऊ शकतो.













