7th Pay Commission : 7 तारखेपासून गणेशोत्सवाचा आनंददायी पर्व सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी पासून सुरु होणारा हा पर्व अनंत चतुर्दशी पर्यंत मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभर आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बाजारात एक वेगळीच चमक दिसत आहे. अशा या आनंददायी वातावरणातच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे. मार्च 2024 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवण्यात आला होता.
आधी हा भत्ता 46% एवढा होता मात्र हा भत्ता 50% करण्यात आला. तसेच ही वाढ जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आली. सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीची भेट मिळत असते. पहिली महागाई भत्ता वाढ तर दिली गेली आहे आता सरकारी कर्मचारी दुसऱ्या महागाई भत्ता वाढीची वाट पाहत आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, ऑक्टोबर महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतच्या प्रस्तावावर केंद्रातील मोदी सरकार हिरवा कंदील दाखवणार आहे. दिवाळीच्या आधीच या प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी सही करतील आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा वाढेल असे म्हटले जात आहे.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतोय मात्र ऑक्टोबर महिन्यामध्ये यात आणखी चार टक्क्यांची वाढ होणे अपेक्षित आहे. म्हणजेच महागाई भत्ता 54% होईल. महत्त्वाचे म्हणजे ही वाढ जुलै 2024 पासून लागू राहणार आहे.
अर्थातच ऑक्टोबर महिन्याच्या पगारांसोबत सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे. दरम्यान आता आपण सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए 54% झाल्यानंतर त्यांच्या पगारात किती वाढ होऊ शकते या संदर्भात अगदी थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
किती वाढेल पगार ?
30 हजार पगार असल्यास : ज्याचे मूळ वेतन 30000 आहे त्याला सध्याच्या 50% दराने 15000 रुपये महागाई भत्ता मिळतोय. पण जेव्हा हा महागाई भत्ता 54% होईल तेव्हा त्याला महागाई भत्ता म्हणून 16200 मिळणार आहेत म्हणजेच त्याच्या पगारात 1200 रुपयांची वाढ होणार आहे.
18 हजार पगार असल्यास : ज्याची बेसिक सॅलरी 18000 रुपये आहे त्याला सध्याच्या 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणून 9000 रुपये मिळत असतील पण जेव्हा महागाई भत्ता 54% होईल तेव्हा त्याला 9720 रुपये मिळणार आहेत. अर्थातच त्याच्या पगारात 720 रुपयांची वाढ होणार आहे.
20 हजार पगार असल्यास : ज्याची बेसिक सॅलरी 20 हजार रुपये आहे त्याला सध्याच्या 50% दराने 10 हजार रुपये महागाई भत्ता मिळत असून जेव्हा हा दर 54% होईल तेव्हा त्याला 10 हजार 800 रुपये मिळणार आहेत. म्हणजेच यामध्ये 800 रुपयांची वाढ होणार आहे.