Discount Offer On AC:- उन्हाळा जवळ आल्यानंतर एसी खरेदी करण्याची उत्तम संधी चालून आली आहे. कारण या काळात अनेक कंपन्या आकर्षक सवलती आणि ऑफर्स देत आहेत. हिवाळा कमी होऊन उष्णता वाढू लागली आहे. त्यामुळे एसीच्या मागणीमध्येही वाढ होईल आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणावर सवलती देण्यात येत आहेत.
फ्लिपकार्टवर १.५ टन स्प्लिट एसीवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध आहे. सॅमसंग, ब्लू स्टार, डायकिन, व्होल्टास, एलजी, कॅरियर, ओ-जनरल यासारख्या प्रमुख ब्रँड्सवर ५५% पर्यंत सवलत मिळू शकते.
याशिवाय फ्लिपकार्टवर एक्सचेंज आणि बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.ज्यामुळे तुम्ही आणखी बचत करू शकता. या सवलतीच्या दरम्यान तुम्हाला एसी अधिक परवडणाऱ्या किंमतीत मिळवण्याची एक सुवर्ण संधी आहे.
या ब्रॅण्ड्स एसींवर भरघोस सूट
एलजी सुपर कन्व्हर्टिबल ५-इन-१ कूलिंग १.५ टन स्प्लिट एसी
हा एक अत्याधुनिक एसीचा पर्याय आहे. या एसीमध्ये हिवाळ्यात उबदार हवा आणि उन्हाळ्यात थंड हवा मिळवण्याची सुविधा आहे.ज्यामुळे प्रत्येक हंगामासाठी योग्य आहे.
सुरुवातीला ८९,९९० किंमतीत असलेला हा एसी सध्या ४९% सवलतीसह ४५,७९० रुपयामध्ये मिळू शकतो.यामध्ये हॉट आणि कोल्ड मोड तसेच अँटी-व्हायरस संरक्षणासह एचडी फिल्टर देखील दिले जात आहेत. याच्या वैशिष्ट्यांमुळे हा एसी एक उत्कृष्ट पर्याय ठरतो.
व्होल्टास १.५ टन ३-स्टार स्प्लिट एसी
हा एक विश्वासार्ह ब्रँड आहे. जो खूप लोकप्रिय आहे. या एसीची मूळ किंमत ६२,९९० रुपये आहे.परंतु त्यावर ४६% सवलत मिळाल्यानंतर त्याची किंमत ३३,९९० रुपये झाली आहे.
फ्लिपकार्टच्या अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५% अधिक सूट मिळवता येईल. हे एसी उत्कृष्ट कूलिंग कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते आणि त्यासोबत एक्सचेंज ऑफर उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही आणखी बचत करू शकता.
डायकिन १.५ टन ५-स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी
या एसीच्या २०२३ मॉडेलचा किंमतीत ३२% सूट मिळत असून या एसीची मूळ किंमत ६७,२०० रुपये आहे.पण सवलतीनंतर ४५,४९० मध्ये मिळू शकतो.हे इन्व्हर्टर एसी आहे. ज्यात २.५ फिल्टर तंत्रज्ञान असून जे हवा स्वच्छ आणि थंड ठेवण्यास मदत करते. तुम्ही तुमचा जुना एसी एक्सचेंज केला तर तुम्हाला ५,००० रुपयापर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते.
ओ-जनरल १.५ टन ३-स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी
हा एक शक्तिशाली आणि कार्यक्षम एसी आहे. याची मूळ किंमत १,११,१८० रुपये असून सध्या ५५% सवलतीसह ४९,९९० रुपयामध्ये उपलब्ध आहे. ओ-जनरलचे एसी चांगले कूलिंग आणि उच्च कार्यक्षमता देतात. जे तुमच्या घरातील वातावरणाला आरामदायक ठेवते.
ब्लू स्टार १.५ टन ३-स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी
या एसीचे २०२४ मॉडेल देखील उत्कृष्ट ऑफर्ससह उपलब्ध आहे. या एसीची मूळ किंमत ६४,२५० रुपये आहे. परंतु ४२% सवलतीनंतर हा एसी ३६,९९० मध्ये मिळू शकतो.यामध्ये वाय-फाय कनेक्टिव्हिटी आहे. ज्यामुळे तुम्ही स्मार्टफोनद्वारेही एसी नियंत्रित करू शकता. यावर एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्ही जुना एसी बदलून ५,००० रुपयापर्यंतची सूट मिळवू शकता.
एक्सचेंज, बँक ऑफर्स आणि ऑफ-सीझन सवलतींचा फायदा घेऊन तुम्ही एसी अधिक परवडणाऱ्या किंमतीत खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर सध्या ज्या मोठ्या प्रमाणावर सवलती आणि ऑफर्स उपलब्ध आहेत त्याचा उपयोग करून तुमची बचत वाढवू शकता. तसेच उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर एसीच्या किमतीतही वाढ होऊ शकते.
त्यामुळे त्याआधी खरेदी करण्याची ही उत्तम वेळ आहे. या सर्व ऑफर्स मर्यादित कालावधीसाठी आहेत. त्यामुळे शक्यतो लवकर खरेदी करा आणि तुमच्या गरजेनुसार सर्वोत्तम एसी निवडा.