Dividend News : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी पुन्हा एकदा कमाईची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे अनेकजण बोनस शेअर्स तसेच Dividend देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करण्याची इच्छा ठेवतात.
दरम्यान जर तुमचीही अशीच इच्छा असेल तर तुमच्यासाठी एका सरकारी कंपनीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सरकारी मालकीच्या ऑइल इंडिया लिमिटेडने सप्टेंबर 2025 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करतांनाचं आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची पण घोषणा केली आहे.

विशेष बाब म्हणजे यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा अंतिम झाली आहे. या सरकारी मालकीच्या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. ह्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 28% वाढून 1,044 कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो मागील तिमाहीतील 813.5 कोटी रुपयांच्या तुलनेत खूप अधिक आहे.
कंपनीचा महसूल सुद्धा 8.9% वाढलाय, आणि 5,456 कोटी रुपयांवर पोहोचला. मागील तिमाहीत महसूल फक्त 5,012 कोटी रुपये होता. पण, त्याचवेळी कंपनीचा EBITDA मागील तिमाहीतील 1,606 कोटी रुपयांवरून 1,324.7 कोटी रुपयांवर आला आहे.
EBITDA मार्जिनमध्ये पण घट नोंदवली गेली आहे. EBITDA मार्जिन 32% वरून 24.3% पर्यंत खाली आले आहे. दरम्यान आता या सरकारी कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. ऑइल इंडियाने 2025-26 आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 3.50 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला असल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच हा निर्णय घेतला असून यामुळे कंपनीचे शेअर्स फोकस मध्ये आहेत. महत्त्वाची बाब अशी की यासाठी 21 नोव्हेंबर 2025 ही रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. तसेच लाभांशाचे पेमेंट 14 डिसेंबर 2025 रोजी किंवा त्यापूर्वी केले जाईल अशी पण माहिती बोर्ड मीटिंग मधून समोर आली आहे.
विशेष म्हणजे याआधी पण कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश दिलेले आहेत. 4 सप्टेंबर 2025 रोजी कंपनीने 1.50 रुपये आणि 17 फेब्रुवारी 2025 रोजी 7 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
शेअर्सची कामगिरी कशी आहे
स्टॉक एक्सचेंज कडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी ऑइल इंडियाचे शेअर्स 0.02% वाढून 434.40 रुपयांवर बंद झाले. मागील सहा महिन्यांत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3.74% रिटर्न दिले आहेत.
पण गेल्या एका वर्षात हा स्टॉक 8.61 टक्क्यांनी घसरला आहे. तसेच पाच वर्षांच्या काळात या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 614% पेक्षा जास्त रिटर्न मिळाले आहेत. अर्थात लॉन्ग टर्म मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना कंपनीकडून चांगला फायदा झाला आहे.













