Dividend Share : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी मकर संक्रांतीच्या काळातच एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. एका बड्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे.
खरे तर अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स तसेच लाभांश वितरित करणाऱ्या कंपन्यांकडे लक्ष ठेवून असतात. अनेकांना अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असते. दरम्यान तुम्ही पण बोनस शेअर्स किंवा लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ICICI Prudential Asset Management ने लाभांश वितरित करण्याची मोठी घोषणा केली असून यामुळे पुन्हा एकदा या कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. खरे तर कंपनीने तिमाही निकाल जाहीर करतानाच आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची मोठी घोषणा केली.
जवळपास पंधरा रुपयांचा लाभांश
ICICI Prudential Asset Management कडून आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 14.85 रुपयांचा डिव्हीडंड दिला जाणार आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपनीच्या संचालक मंडळाने यासाठीच्या रेकॉर्ड तारखेची पण घोषणा केली आहे.
रेकॉर्ड डेट आताच नोट करा
कंपनीने यासाठी 16 जुलै रेकॉर्ड तारीख म्हणून सेट केली आहे. या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांनाचं याचा लाभ मिळणार आहे.
शेअर तेजीत येणार !
कंपनीने तिमाही निकाल जाहीर करताना लाभांशाची मोठी घोषणा केली. यामुळे येत्या काळात कंपनीच्या शेअर्समध्ये आणखी तेजी येऊ शकते. आता येत्या काळात या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये कशी कामगिरी करतात? हे पाहावे लागेल.












