Dividend Stock : गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये लिस्टेड कंपन्यांकडून सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले जात आहेत. निकाला सोबतच काही कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बेनिफिट सुद्धा देत आहेत. अनेक कंपन्यांनी गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअरची घोषणा केली आहे तर काही कंपन्या डिविडेंट देत आहेत.
दरम्यान तुम्हीही बोनस शेअर्स देणाऱ्या किंवा डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. HCL Technologies ने शेअर होल्डर साठी लाभांश देण्याची मोठी घोषणा केली आहे. खरे तर कंपनीने अलीकडेच आपला सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर केला.

या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 10 टक्क्यांनी वाढला आहे. कंपनीला जुलै – सप्टेंबर तिमाहीत 4235 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दरम्यान हा निकाल जाहीर करतानाच कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्स ला डिव्हीडंट देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
किती डेव्हिडंट मिळणार
HCL Technologies ने आपल्या शेअर होल्डर साठी 12 रुपयाचा अंतरीम लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात शेअर होल्डर्सला कंपनीच्या प्रत्येक शेअर मागे 12 रुपयाचा अंतरीम लाभांश मिळणार आहे.
कंपनीच्या संचालक मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला असून यासाठीची रेकॉर्ड डेट सुद्धा फायनल झाली आहे. याची रेकॉर्ड डेट 17 ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. तसेच डिव्हिडंडचा लाभ 28 ऑक्टोबरला मिळणार आहे.
ज्या शेअर होल्डर्स कडे 17 ऑक्टोबर पर्यंत कंपनीचे शेअर्स असतील त्यांना या लाभांशाचा लाभ मिळणार आहे. आता आपण या कंपनीच्या स्टॉकची शेअर मार्केट मधील कामगिरी कशी राहिली आहे याची माहिती पाहूयात.
किती रिटर्न मिळालेत?
कंपनीकडून आपल्या शेअर होल्डर्सला 91 व्या वेळा डिव्हीडंट दिला जाणार आहे. सध्या या कंपनीचे स्टॉक 1494 रूपयांच्या रेंजमध्ये व्यवहार करत आहेत. गेल्या सहा महिन्यात या कंपनीचे स्टॉक 4.74 टक्क्यांनी वाढले आहेत.
पण गेल्या बारा महिन्यात या कंपनीचे स्टॉक 20 टक्क्यांनी घसरले आहेत. तसेच या वर्षात आत्तापर्यंत कंपनीचे स्टॉक 21.85 टक्क्यांनी घसरले आहेत. अर्थातच या कंपनीची अलीकडील कामगिरी चिंतेची राहिली आहे.