‘या’ 5 कंपन्या शेअर होल्डर्सला देणार Dividend ! गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी 

Published on -

Dividend Stock : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. खरंतर शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्यांच्या माध्यमातून तिमाही निकाल जाहीर करणे सुरूच आहे. कंपन्या त्यांच्या सप्टेंबर तिमाहीतील कामगिरीचा डेटा जाहीर करत आहेत. आतापर्यंत बहुतांशी कंपन्यांनी आपल्या सप्टेंबर तिमाहि निकाल जाहीर केले आहेत.

तसेच अनेक कंपन्या नजीकच्या भविष्यात त्यांचे तिमाही निकाल जाहीर करणार अशी आशा आहे. दुसरीकडे शेअर मार्केट मधील काही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना कॉर्पोरेट बेनिफिट उपलब्ध करून देत आहेत. अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअरची भेट देत आहेत तर काही कंपन्यां लाभांशचा लाभ देत आहेत.

दरम्यान जर तुम्हीही बोनस शेअर्स तसेच डिव्हीडंट देणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. शेअर मार्केट मधील जवळपास पाच कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देणार आहे. शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर पाच कंपन्यांनी आपल्या शेअर होल्डर्स साठी लाभांश जाहीर करण्याची घोषणा केली आहे.

यामुळे या पाचही कंपन्यांचे स्टॉक पुन्हा एकदा फोकस मध्ये आले आहेत. या कॉर्पोरेट लाभाची सध्या शेअर मार्केटमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान यापैकी दोन कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना त्यांच्या लाभांश मंजुरीची माहिती दिली आणि तीन कंपन्यांनी घोषणा केली की ते त्यांच्या आगामी बोर्ड बैठकींमध्ये लाभांशाचा विचार करणार आहेत.

गॅब्रिएल इंडिया – ही कंपनी लवकरच आपल्या शेअरहोल्डर्ससाठी लाभांश जाहीर करू शकते. शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर कंपनीने स्टॉक एक्सचेंजला याबाबत माहिती दिली आहे. या कंपनीचे संचालक मंडळ 12 नोव्हेंबर रोजी एक महत्त्वाची बैठक घेणार आहे आणि या महत्त्वाच्या बैठकीत संचालक मंडळाकडून लाभांश देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाणार आहे.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर करतानाच कंपनीकडून लाभांश दिला जाणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे शेअर होल्डरसाठी लाभांश मंजूर करण्यात आला तर 21 नोव्हेंबर ही या लाभांशासाठीची रेकॉर्ड डेट राहणार आहे.

जेएम फायनान्शियल – कंपनीने अजून लाभांश जाहीर केलेला नाही. परंतु शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर या कंपनीने असे जाहीर केले आहे की त्यांच्या संचालक मंडळाची बैठक 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या बैठकीत, कंपनी दुसऱ्या अंतरिम लाभांशावर विचार करणार आहे आणि सप्टेंबर तिमाहीचे निकाल देखील याच बैठकीत सादर केले जाणार आहेत.

सास्केन टेक्नॉलॉजीज – या कंपनीचीही सात नोव्हेंबरला बैठक होणार आहे. बीएसई स्मॉलकॅप इंडेक्समध्ये सूचीबद्ध असलेल्या या आयटी कंपनीने शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर लाभांश देण्याबाबत आगामी बैठकीत विचार केला जाणार असे स्पष्ट केले.

त्यांचे संचालक मंडळ 7 नोव्हेंबर रोजी बैठक घेईल, जिथे निकाल सादर केले जातील आणि अंतरिम लाभांश प्रस्तावावर निर्णय घेतला जाईल. कंपनीच्या मते, जर लाभांश जाहीर झाला तर 13 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट असेल.

आर आर केबल – या कंपनीने शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतर तिमाही निकाल जाहीर केले आहेत. यासोबतच कंपनीने शेअर होल्डर्सला चार रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर केला आहे. यासाठीची रेकॉर्ड डेट 7 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

बाळकृष्ण इंडस्ट्रीज – शुक्रवारी मार्केट क्लोज झाल्यानंतरही बाळकृष्ण इंडस्ट्रीने देखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कंपनीने सप्टेंबर तिमाही निकाल सुद्धा जाहीर केलेत.

तसेच प्रति शेअ 4 रुपये अंतरिम लाभांश सुद्धा मंजूर केला. महत्वाची बाब म्हणजे यासाठीची रेकॉर्ड डेट सात नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना या लाभांशाचा फायदा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe