Dividend Stock:- शेअर मार्केटमध्ये अनेक कंपन्या या त्यांच्या गुंतवणूकदार म्हणजे भागधारकांसाठी डिव्हिडंड म्हणजे अंतिम लाभांश जाहीर करतात. यामुळे त्या त्या कंपन्यांच्या शेअर होल्डर्सना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळवण्याची एक नामीसंधी या निमित्ताने मिळत असते. शेअरच्या किमती वाढल्यामुळेच गुंतवणूकदारांना फायदा होतो असे नाही तर अशा प्रकारे डिव्हिडंड म्हणजेच अंतिम लाभांशाच्या निमित्ताने देखील अतिरिक्त नफा या माध्यमातून मिळत असतो. अगदी याच पद्धतीने आपण बघितले तर येणाऱ्या आठवड्यामध्ये बऱ्याच कंपन्या भागधारकांसाठी डिव्हिडंड जाहीर करणार आहेत व त्यासाठीच्या रेकॉर्ड देखील निश्चित करण्यात आलेले आहेत. चला तर मग त्या संबंधीचीच माहिती या लेखात बघू.
या कंपन्या देणार अंतिम लाभांश
1-HUDCO- हुडकोच्या माध्यमातून भागधारकांसाठी लाभांश जाहीर करण्यात आला आहे व ही कंपनी प्रतिशेयर 1.6 इतका डिव्हीडंड देणार आहे व याकरिता 9 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट करण्यात आलेली आहे.

2- फोर्स मोटर- ऑटोमोबाईल क्षेत्रातील महत्त्वाची असलेली ही कंपनीने देखील डिव्हिडंड निश्चित केला आहे व प्रतिशेअर 40 इतका डिविडेंड देणार आहे. याकरिता कंपनीने 10 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.
3- आरबीएल बँक- या बँकेच्या माध्यमातून देखील डिव्हीडंड म्हणजेच लाभांश जाहीर करण्यात आलेला आहे व ही बँक प्रति शेअर 1 याप्रमाणे डिव्हिडंड देणार आहे. याकरिता बँकेने 9 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
4- टिटाघर रेल सिस्टम- या कंपनीच्या माध्यमातून देखील डिव्हीडंड जाहीर करण्यात आलेला असून ही कंपनी प्रति शेअर 1 याप्रमाणे डिव्हिडंड देणार असून याकरिता 8 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.
5- बिर्ला कॉर्पोरेशन- बिर्ला कॉर्पोरेशनच्या माध्यमातून शेअर होल्डर्स करिता डिव्हीडंड जाहीर करण्यात आलेला आहे व ही कंपनी प्रतिशेअर दहा याप्रमाणे डिव्हिडंड देणार आहे व याकरिता 8 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे.
6- कोचीन शिपयार्ड- कोचिन शिपयार्डच्या माध्यमातून देखील भागधारकांसाठी डिव्हिडंड जाहीर करण्यात आला असून ही कंपनी प्रतिशेअर 2.25 इतका डिव्हिडंड निश्चित केला असून 12 सप्टेंबर 2025 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे.