Dividend Stock : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सध्या शेअर मार्केट मधील लिस्टेड कंपन्या आपले तिमाही निकाल जाहीर करत आहेत. सोबतच बोनस शेअर्स आणि लाभांश सारख्या कॉर्पोरेट लाभाची देखील घोषणा केली जात आहे.
दरम्यान अनेक गुंतवणूकदार बोनस शेअर्स देणाऱ्या तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी एका सिमेंट कंपनीने एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे.

सिमेंट उत्पादक श्री सिमेंटने त्यांच्या तिमाही निकालांमध्ये गुंतवणूकदारांसाठी लाभांश देण्याची योजना आणली आहे. हा लाभांश गुंतवणूकदारांना 14 नोव्हेंबर पासून वितरित करण्यात येणार आहे. तसेच यासाठीची रेकॉर्ड डेट तीन नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हे दिग्गज सिमेंट उत्पादक कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 800% लाभांश देणार आहे. थोडक्यात कंपनीच्या माध्यमातून प्रत्यक शेअरमागे 80 रुपयांचा लाभांश दिला जाणार असून यामुळे या कंपनीचे स्टॉक पुन्हा एकदा स्टॉक एक्सचेंजवर फोकस मध्ये आले आहेत.
या कॉर्पोरेट लाभाची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कंपनीच्या इतिहासात पहिल्यांदाच कंपनी एवढा मोठा लाभांश आपल्या गुंतवणूकदारांना देणार आहे. यामुळे या लाभांशाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
शेअर मार्केट तज्ञ काय सांगतात
कंपनीचा शेअर येत्या काळात आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याची क्षमता ठेवतो. शुक्रवारी या कंपनीचा स्टॉक 28 हजार 288 रुपयांवर क्लोज झाला. दरम्यान, जागतिक ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने या स्टॉक बाबत पॉझिटिव्ह आउटलूक दिला आहे.
श्री सिमेंटला ब्रॉकरेंज कडून तटस्थ रेटिंग देण्यात आली आहे. या स्टॉक साठी ब्रोकरेजने 32 हजार 250 रुपयांची टार्गेट प्राईस निश्चित केली आहे. अर्थात येत्या काळात या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न मिळू शकतात.
ब्रोकरेजचे म्हणणे आहे की जरी वसुली 2 टक्क्यांनी किंचित कमी झाली असली तरी प्रीमियम उत्पादनांचे मिश्रण 21 टक्क्यांवर स्थिर राहिले आहे. यामुळे या शेअर्समध्ये केलेली गुंतवणूक गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक ठरत आहे. थोडक्यात पुढील काळ या शेअरसाठी फायद्याचा राहणार आहे.













