Dividend Stock: वैद्यकीय क्षेत्रातील ‘ही’ कंपनी देणार मोठा डिव्हिडंड! तुमच्याकडे आहेत का शेअर्स? नोट करा रेकॉर्ड डेट

Published on -

Dividend Stock:- सध्या जर आपण बघितले तर अनेक कंपन्यांच्या माध्यमातून भागधारकांना अंतिम लाभांश जाहीर केला जात आहे व त्या माध्यमातून भागधारकांना अतिरिक्त आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत झालेली आहे. तसेच काही कंपन्यांच्या माध्यमातून स्प्लिट स्टॉकची घोषणा करण्यात आल्याने देखील गुंतवणूकदारांना फायदा होताना आपल्याला दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर चढ-उतार होत आहे व या चढउताराच्या कालावधीत देखील वैद्यकीय उपकरणाचे उत्पादन करणारी पॉली मेडिक्युअर या महत्त्वाच्या कंपनीने आपल्या भागधारकांसाठी डिव्हिडंड म्हणजेच अंतिम लाभांश जाहीर केलेला आहे व इतकेच नाही तर याकरिता कंपनीने रेकॉर्ड डेट देखील घोषित केलेली आहे. चला तर मग यासंबंधीचीच माहिती या लेखात बघू.

पॉली मेडिक्युअर कंपनी देणार डिव्हिडंड

याबाबत सविस्तर वृत्त असे की, वैद्यकीय उपकरणाचे उत्पादन करणारी प्रसिद्ध कंपनी पॉली मेडिक्यूअरने आपल्या भागधारकांकरिता लाभांश जाहीर केला असून ही कंपनी प्रति शेअर 3.50 रुपये अंतिम लाभांश देणार आहे. एवढेच नाही तर या कंपनीच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून दीर्घकाळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देखील दिला आहे.पॉली मेडिक्युअरने शुक्रवारी शेअर बाजाराला माहिती देताना म्हटले की, पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरवर 3.50 रुपये अंतिम लाभांश दिला जाणार आहे व याकरिता कंपनीच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून 19 सप्टेंबर 2025 रेकॉर्ड डेट घोषित करण्यात आलेली आहे. सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे ज्या गुंतवणूकदारांकडे या दिवशी या कंपनीचे शेअर्स असतील त्यांना प्रति शेअर 3.50 रुपये इतका लाभ मिळणार आहे.

या कंपनीच्या शेअरचा सध्याचा परफॉर्मन्स

हे शुक्रवारी बीएसईवर पॉली मेडिक्युअर शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली व या घसरणीसह 2037.55 रुपयांवर बंद झाला. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत या शेअरच्या किंमतीमध्ये 23 टक्क्यांची घसरण झाली व एका वर्षात 20 टक्क्यांनी किमती घसरल्या. 52 आठवड्यांची कमाल किंमत 3350 रुपये तर किमान किंमत 1822.65 इतकी राहिली. तीन वर्षात या शेअर्सनी 133% परतावा दिला आहे तर पाच वर्षात ही 354 टक्क्यांचा परतावा दिलेला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News