Dividend Stock : बोनस शेअर्स तसेच लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेअर मार्केट गुंतवणूकदारांना पुन्हा एकदा कमाईची संधी उपलब्ध झाली आहे. खरे तर अनेक जण बोनस शेअर्स आणि लाभांशी देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छित आहेत.
दरम्यान जर तुमचाही असाच प्लॅन असेल तर तुमच्यासाठी सॅनोफी इंडिया लिमिटेडने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सॅनोफी इंडिया लिमिटेडने लाभांश देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ही कंपनी प्रति शेअर 75 रुपये लाभांश देणार आहे. महत्वाची बाब म्हणजे कंपनीने यासाठीची रेकॉर्ड सुद्धा निश्चित केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या लाभांशासाठी सात नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट फायनल करण्यात आली आहे. अर्थात या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे कंपनीचे शेअर्स असतील त्यांना या लाभांशाचा लाभ दिला जाणार आहे. Sanofi India Ltd च्या संचालक मंडळाने 29 ऑक्टोबर रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान यासाठी 7 नोव्हेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याने आजपर्यंत या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाचं याचा लाभ दिला जाणार आहे. जे लोक उद्या या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतील त्यांना लाभ मिळणार नाही. म्हणजेच या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांकडे आजचा दिवस शिल्लक आहे.
उद्यापर्यंत ज्या गुंतवणूकदारांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये असेल त्यांना प्रति शेअर 75 रुपयांचा लाभांश मिळेल. विशेष म्हणजे हा लाभांश जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत शेअर होल्डर्स ला दिला जाणार असल्याची ही माहिती देण्यात आली आहे. या कंपनीचा प्रत्येक शेअर हा दहा रुपये फेस व्हॅल्यूचा आहे.
या कंपनीने आधीही आपल्या गुंतवणूकदारांना विविध लाभ दिल्या आहेत. यापूर्वी कंपनीने 2024-25 आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 117 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला होता. ही कंपनी एक मल्टिनॅशनल औषध निर्माता कंपनी म्हणून ओळखली जाते. कंपनी भारताबरोबरच परदेशात सुद्धा सक्रिय व्यवसाय करते.
मंगळवारी या कंपनीचा स्टॉक 4752 रुपयांवर बंद झाला. मात्र कंपनीची गेल्या काही वर्षांमधील कामगिरी फारशी उत्साहवर्धक राहिलेली नाही. गेल्या बारा महिन्यांमध्ये कंपनीचे स्टॉक 28 टक्क्यांनी घसरले आहेत तसेच मागील सहा महिन्यांमध्ये यात 20 टक्क्यांची घसरण झाली आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांमध्ये या कंपनीचे स्टॉक स्थिर आहेत.