Dividend Stock : शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गुंतवणूकदारांना शेअर मार्केट मधून कमाईची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. खरे तर शेअर मार्केट मधील काही कंपन्या सध्या तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश तसेच बोनस देण्याची घोषणा करत आहेत.
Siemens Energy India Limited ने सुद्धा तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. खरेतर, या कंपनीच्या शेअर्समध्ये निकाल जाहीर झाल्यापासून तेजी आहे. मंगळवारी पण यात चांगली तेजी पाहायला मिळाली.

कंपनीच्या नफ्यात आणि महसूलात मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला असून, सुमारे ५% पर्यंत शेअरभाव उंचावला. कंपनीने चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना पहिल्यांदाच आपल्या शेअर होल्डर्स साठी लाभांश जाहीर केला आहे.
ही कंपनी आपल्या इतिहासात पहिल्यांदाच लाभांश देणार असल्याने या घोषणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आणि कंपनीचे स्टॉक फोकस मध्ये आले आहेत. एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, २ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येकी शेअरवर ४ रुपये म्हणजेच २००% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे.
या लाभांशाची रेकॉर्ड तारीख लवकरच घोषित केली जाणार आहे. व्यापाराच्या सुरुवातीला Siemens Energy India चा शेअर बीएसईवर ३,२४९ रुपयांवर उघडला आणि इंट्रा-डे व्यवहारात ३,३०३ रुपयांच्या उच्चांकाला स्पर्श केला. मात्र त्यानंतर नफावसुलीच्या दबावामुळे शेअर ३,०७० रुपयांपर्यंत घसरला.
कंपनीने ३० सप्टेंबर २०२५ समाप्त झालेल्या तिमाहीत ३५९.६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला असून, हा आकडा मागील वर्षीच्या २७३.७ कोटी रुपयांच्या तुलनेत ३१% अधिक आहे. महसूलदेखील वार्षिक २७.१% वाढीसह २,६४५.७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
तसेच कंपनीचा खर्च २८.५% वाढून २,२०४ कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, कंपनीचा ऑर्डर बुक ४७% वाढून १६,२०५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला असून नवीन ऑर्डर्स २,३५१ कोटी रुपयांवर स्थिर असल्याचे कंपनीने सांगितले. गेल्या आठवड्यात कंपनीचा शेअर ८%ने घसरला होता.
महिनाभरात शेअरमध्ये २% घसरण झाली असून, मागील तीन महिन्यांत किंमतीत ९% घसरण नोंदवली गेली आहे. सध्या कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३,६२४ रुपये आणि नीचांक २,५२९ रुपये एवढा आहे.
Siemens Energy India चे मार्केट कॅप १.०९ लाख कोटी रुपये असून प्रवर्तकांकडे ७५% तर जनतेकडे २५% हिस्सा आहे. कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नमध्ये मागील तीन तिमाहीत कोणताही बदल झालेला नाही.













