Dividend Stock: बापरे! ‘ही’ कंपनी देणार तब्बल 700% डिव्हिडंड…पटकन नोट करा रेकॉर्ड डेट

Published on -

Dividend Stock:- सध्या गुंतवणूकदारांसाठी अनेक कंपन्यांच्या माध्यमातून अंतिम लाभांश म्हणजेच डिव्हिडंड जाहीर केला जात असून या माध्यमातून नक्कीच अतिरिक्त आर्थिक उत्पन्न गुंतवणूकदारांना मिळणार आहे. यामध्ये लोह आणि स्टील उत्पादने बनवणारी महत्त्वाची एक कंपनी म्हणजे रत्नमणी मेटल्स अँड ट्युब्स लिमिटेड ही होय. या कंपनीने शेअर होल्डर्स करीता एक महत्त्वाची घोषणा केली असून कंपनीच्या माध्यमातून तब्बल 700 टक्के अंतिम लाभांश जाहीर करण्यात आलेला आहे. त्यासंबंधीचीच माहिती या लेखात बघू.

रत्नमणी मेटल्स अँड ट्युब्स लिमिटेड कंपनी देणार अंतिम लाभांश

याबाबत सविस्तर वृत्त असे की, लोह आणि स्टील उत्पादने बनवणारी कंपनी रत्नमणी मेटल्स अँड ट्युब्स लिमिटेड या कंपनीने त्यांच्या शेअर होल्डर्स करिता अंतिम लाभांश जाहीर केला असून कंपनीच्या माध्यमातून घोषणा करण्यात आली आहे की 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता प्रतिशेअर 14 रुपये म्हणजेच तब्बल 700% अंतिम लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे या कंपनीच्या शेअर होल्डर्सना खूप मोठा आर्थिक फायदा होण्यास मदत होणार आहे.

रेकॉर्ड डेट काय?

रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स या लोह आणि स्टील उत्पादन बनवणाऱ्या कंपनीने शेअर होल्डर्स करिता प्रतिशेअर 14 रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे व यासाठीची रेकॉर्ड सध्या जवळ आली असून ती 2 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आलेली आहे. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले म्हणजे या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदारांकडे या कंपनीचे शेअर्स आहेत त्यांना या डिव्हिडंडचा फायदा मिळणार आहे. या आधी या कंपनीने 2024 मध्ये प्रतिशेअर 14 रुपयांचा अंतिम लाभांश दिला असून 2023 मध्ये ही रक्कम प्रति शेअर 12 रुपये होती.

आतापर्यंत या शेअरचा परफॉर्मन्स कसा?

28 ऑगस्ट 2025 रोजी रत्नमणी मेटल्स अँड ट्यूब्स या कंपनीचा शेअर बीएसईवर घसरून 2378.70 रुपयांवर ट्रेड करत आहे. एक महिन्यात अकरा टक्के तर तीन महिन्यात 17% ची घसरण यामध्ये झालेली असून सहा महिन्यात हा शेअर तीन टक्क्यांनी घसरला आहे. एक वर्ष कालावधीमध्ये तब्बल 34 टक्क्यांची घसरण यामध्ये पाहायला मिळाली.परंतु दीर्घ कालावधीत बघितले तर कंपनीचा परफॉर्मन्स अतिशय मजबूत असल्याचे दिसून आले आहे. पाच वर्षात या शेअर्सने तब्बल 201 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe