Diwali Bonus:- सध्या दिवाळी सारखा महत्त्वाचा सण तोंडावर आला असल्याने कर्मचाऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या दिवाळी बोनसची प्रतीक्षा आहे. आपल्याला माहित आहे की दिवाळीमध्ये सरकारच्या माध्यमातूनच नाहीतर अनेक खाजगी क्षेत्रातील मोठ मोठ्या कंपन्या देखील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देत असतात. या संदर्भात जर बघितले तर केंद्र सरकारने 24 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिवाळी बोनस संदर्भातील एक महत्त्वाचा निर्णय घेतला व या निर्णयाच्या माध्यमातून रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे. म्हणजेच देशातील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार असून याकरिता 1866 कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे. याचा फायदा देशातील 10.91 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे.
किती दिला जाईल दिवाळी बोनस?
दरवर्षीप्रमाणे हा बोनस कर्मचाऱ्यांना मिळणारा असून कर्मचाऱ्यांच्या 78 दिवसाच्या पगारा इतका बोनस कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. हा बोनस नॉन राजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना दसऱ्याच्या सुट्टीपूर्वी आणि दुर्गा पूजेच्या पार्श्वभूमीवर दिला जाणार आहे. म्हणजेच या बोनसच्या माध्यमातून प्रत्येक पात्र असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्याला कमाल 17951 रुपये बोनस मिळणार आहे. ट्रेन मॅनेजर( गार्ड ), ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट, सुपरवायझर, स्टेशन मास्टर, तंत्रज्ञ मदतनीस, पॉईंट मेन, मंत्री कर्मचारी आणि इतर गट क कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे.

बोनसचा मार्केटला होईल फायदा
हा बोनस कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा देणारा आहेच. परंतु बाजारपेठेसाठी देखील एक चांगली बातमी आहे. दिवाळीमध्ये दुकानदार आणि व्यवसाय विशेषतः अलीकडच्या जीएसटी कपातीनंतर जास्त मागणीची अपेक्षा करत आहेत. यामध्ये शहरी आणि निमशहरी भागातील एक प्रमुख ग्राहक वर्ग असलेले रेल्वे कर्मचारी या बोनस द्वारे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच कपडे आणि इतर वस्तूंची खरेदीमध्ये वाढ करू शकतात व यानिमित्ताने मार्केटमध्ये चांगली उलाढाल होण्याची अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.