Diwali Home Loan Offer : नवीन घर खरेदी करणाऱ्यांसाठी आज आम्ही कामाची माहिती घेऊन आलो आहोत. अलीकडे घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामुळे घर खरेदीसाठी गृह कर्जाचा पर्याय स्वीकारावा लागतोय.
अशा स्थितीत ज्यांना घर खरेदीसाठी होम लोन घ्यायचे असेल त्यांच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. खरे तर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अनेकजण नवीन घर खरेदी करणार आहेत.

तुम्हीही दिवाळीला नवीन घर खरेदी करणार असाल आणि यासाठी तुम्हाला होम लोन घ्यायचे असेल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. आज आम्ही तुम्हाला अशा पाच बँकांची माहिती सांगणार आहोत जिथे तुम्हाला स्वस्तात गृह कर्ज मिळणार आहे.
होम लोनचे व्याजदर झाले कमी
या वर्षात देशभरातील अनेक प्रमुख बँकांनी होम लोनच्या व्याज दरात मोठी कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून रेपो रेट मध्ये यावर्षी एक टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. अलीकडेच संपन्न झालेल्या आरबीआयच्या पतधोरण बैठकीत रेपो रेट कमी झाले नाहीत.
मात्र या वर्षात आत्तापर्यंत रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात झालीये. यामुळे नव्याने गृह कर्ज घेणाऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय. आता आपण कमीत कमी व्याजदरात गृह कर्ज ऑफर करणाऱ्या पाच बँकांची माहिती पाहूया.
कमीत कमी व्याजदरात कर्ज देणाऱ्या बँका
1.Tata Capital – 7.75%
2.एलआयसी हाउसिंग फायनान्स – 7.50%
3.बजाज फिनसर्व – 7.45 %
4.पिरामल कॅपिटल एंड हाउसिंग फायनान्स – 9%
5.पीएनबी हाउसिंग फायनान्स – 8.25%