Diwali Stock : गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळत आहे. शेअर मार्केट मधील अस्थिरता गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय ठरतोय. पण या अस्थिरतेच्या काळातही काही स्टॉक गुंतवणूकदारांना चांगला नफा देत आहेत. काही शेअर्स लॉंग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहेत तर काही शेअर्स शॉर्ट मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतायेत.
दरम्यान जर तुम्हालाही येत्या दिवाळीत शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी खास ठरणार आहे. आज आपण ब्रोकरेज फर्मने सांगितलेल्या टॉपच्या शेअर्स बाबत माहिती पाहणार आहोत.

दिवाळी जवळ आली आहे आणि जर तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओ मजबूत बनवायचा असेल, तर दरवर्षीप्रमाणे, चॉइस इक्विटी ब्रोकरेजने काही खास स्टॉकची शिफारस केली आहे,
जे गुंतवणूकदारांसाठी एक चांगली संधी असू शकतात. यामध्ये फेडरल बँक, सिप्ला, भारत डायनॅमिक्स सारख्या स्टॉकचा समावेश आहे. हे स्टॉक बाजारात चांगली कामगिरी करू शकतात, विशेषतः या सणासुदीच्या काळात.
फेडरल बँक – हा स्टॉक २१३ किंवा २०७ रुपयांच्या आसपास खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी २४५ आणि २५५ रुपयांची टारगेट प्राईस निश्चित केली आहे. हा स्टॉक सातत्याने वर जात आहे आणि त्याची किंमत स्थिरता दर्शवत आहे. किंमत २२० रुपयांच्यावर गेल्यास आणखी वाढ होणार आहे. ही बँक तिच्या मजबूत कामगिरीसाठी ओळखली जाते.
सिप्ला – ब्रोकरेज फर्मने हा स्टॉक १५४५ किंवा १५०० च्या आसपास खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यासाठी १७७० आणि १८५० रुपये टारगेट प्राईस निश्चित केली आहे. सिप्लाचे शेअर्स एका विशिष्ट पॅटर्नमध्ये फिरत आहेत ज्याला चढता त्रिकोण म्हणतात. याची किंमत १४८० च्या आसपास असेल तर ती खरेदीची चांगली संधी असू शकते.
भारत डायनॅमिक्स (BDL) – या कंपनीचे शेअर्स सुमारे १,४८५ किंवा १,४४० रुपयांना खरेदी करता येतील. यासाठी १,७०० आणि १,७८५ रुपयांची टारगेट प्राईस दिली आहे.