Diwali Stock : दिवाळी सोने – चांदी सोबतच शेअर मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाते. दरवर्षी दिवाळीत मुहूर्त ट्रेडिंग होत असते. दरम्यान तुम्हीही यावर्षी दिवाळीत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणार असाल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे.
आज आपण अशा पाच स्टॉक बाबत माहिती पाहणार आहोत ज्यातून गुंतवणूकदारांना पुढील बारा महिन्यांच्या काळात 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे या दिवाळीत स्टॉक खरेदी केल्यानंतर पुढल्या दिवाळीत गुंतवणूकदारांना 20 टक्के अधिक रिटर्न मिळतील आणि

यामुळे त्यांची पुढील दिवाळी अधिक आनंदाची होणार आहे. एसबीआय सिक्युरिटीज या टॉप ब्रोकरेजने यावर्षी टॉप दिवाळी स्टॉक सुचवले आहेत. आता आपण एसबीआय सिक्युरिटीजने सुचवलेल्या स्टॉकपैकी टॉप 5 स्टॉक्स बाबत माहिती पाहूयात.
हे शेअर्स गुंतवणूकदारांना देणार 20 टक्के रिटर्न
Jubilant Foodworks : या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 597.30 रुपये आहे. परंतु पुढील बारा महिने या शेअर साठी विशेष फायद्याचे ठरणार आहेत. यात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील बारा महिन्यांमध्ये पंधरा टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळू शकतात असा अंदाज आहे.
National Aluminum Company – सध्या या कंपनीचे शेअर्स 225 रुपये यांवर व्यवहार करताना दिसतात. हा स्टॉक आपल्या करंट मार्केट प्राइस पेक्षा 20 टक्क्यांनी वाढणार असा अंदाज आहे. थोडक्यात या दिवाळीत यात गुंतवणूक करणाऱ्यांना पुढील दिवाळीत 20% रिटर्न मिळू शकतात.
HDFC Bank – हा स्टॉक सध्या 975 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेड करतोय. पण आपल्या करंट मार्केट प्राइस पेक्षा या स्टॉक मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या बारा महिन्यांमध्ये हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना 14% रिटर्न देऊ शकतो असा अंदाज देण्यात आला आहे. त्यामुळे ब्रोकरेज कडून या स्टॉक साठी बाय रेटिंग देण्यात आली आहे.
Apollo Hospital – तुम्हालाही मेडिकल स्टॉक मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी या कंपनीचे शेअर्स कायद्याचे ठरतील. आज रोजी या स्टॉकची करंट मार्केट प्राइस 7671 रुपये आहे. विशेष म्हणजे येत्या 12 महिन्यांमध्ये या कंपनीचे स्टॉक 13 टक्क्यांपर्यंत रिटर्न देण्याची क्षमता ठेवतात.
TVS Motors – या कंपनीच्या स्टॉप चे करंट मार्केट प्राइस 3489 रुपये आहे. पण येत्या काळात हा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याची शक्यता आहे. या दिवाळीत या स्टॉकची खरेदी केली तर पुढल्या दिवाळीत गुंतवणूकदारांना 13 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतील असा अंदाज आहे.