Business Idea : तुम्ही नोकरी करत असाल आणि नोकरीसोबतच जर तुम्हाला शेती असेल व तुम्ही नोकरीसोबत शेती करून पैसे कमाऊ इच्छित असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला शेतीतील एका पिकाबद्दल माहिती देणार आहोत. याची जर लागवड केली तर तुम्ही नोकरीपेक्षा जास्त पैसे यातून कमाऊ शकता. कारण याची डिमांड औषध सेक्टरसह अनेक सेक्टरमध्ये वाढली आहे.
या पिकाचे नाव आहे ‘पुदिना’. याद्वारे 3 महिन्यांत 3 पट जास्त कमाई तुम्ही करू शकता. सध्या जगात आयुर्वेदिक प्रॉडक्टची मागणी वाढली आहे. व पुदिन्यापासून अनेक आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवले जातात. चला आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ

आपल्याकडे पुदिन्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. काही ठिकाणी याला मेंथा असे म्हणतात. काही भागांमध्ये याला मेंथा प्रीपरटा असेही म्हणतात पुदिन्यापासून बहुगुणी तेल काढले जाते. याची लागवड शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत फायदेशीर आहे.
मेंथा हे एक सुगंधी पीक आहे, 1960 मध्ये हरितक्रांती दरम्यान आपल्या देशात त्याच्या लागवडीवर विशेष लक्ष दिले गेले होते. यातून तुम्हाला कमाईची खूप संधी आहे. पुदिन्याचा वापर औषधे, तेल, सौंदर्य उत्पादने, टूथपेस्ट आदींसह अनेक उत्पादनात केला जातो.
पुदिन्याच्या शेतीविषयी थोडेसे
पुदिन्याच्या लागवडीसाठी पाण्याची योग्य व्यवस्था असावी. पुदिना साधारण पीक ३ महिन्यांत तयार होते. मेथी लागवडीसाठी मातीचे pH मूल्य 6.5 ते 7.5 दरम्यान असावे. पुदिन्याच्या पानात भरपूर पोषक तत्वे असतातच परंतु त्यांना एक सुगंध देखील असतो.
पुदिन्याची लागवड साधारण फेब्रुवारी ते एप्रिलच्या मध्यापर्यंत करता येते. जूनमध्ये साधारण हे पीक काढणीस येते. काढणीवेळी याची पाने तोडली जातात. या पिकाला जमीन साधारण हलकी ओली असली पाहिजे. त्यामुळे दर 8 दिवसांनी याला पाणी देणे फार गरजेचे आहे.
किती हॊईल कमाई
पुदिना लागवडीसाठी खर्च खूप कमी येतो. साधारण ३ महिन्यात हे पीक काढणीस येते. त्यामुळे अवघ्या तीन महिन्यात तुम्हाला पैसे मिळून जातात. साधारण एक एकरात पुदिना लागवड केली तर 20 हजार ते 25 हजार रुपये खर्च येतो. बाजारात पुदिन्याचा भाव 1000 ते 1500 रुपये प्रतिकिलो इतका आहे. हेक्टरी साधारण दोन ते अडीच लाखांचे उत्पन्न मिळते.