Canara Bank Share Price:- आज 12 ऑगस्ट 2025 रोजी मार्केटची सुरुवात अतिशय चांगल्या पद्धतीने झाली व त्यानंतर मात्र घसरण पाहायला मिळाली. परत काही कालावधीसाठी सेन्सेक्स आणि निफ्टी या महत्त्वाच्या निर्देशांकामध्ये वाढ झाली व आता पुन्हा या दोन्ही निर्देशांकामध्ये किंचितशी घसरण पाहायला मिळत आहे. सध्या सेन्सेक्स 122.0 तीन अंकांनी घसरून 80495.05 वर व्यवहार करत आहे तर निफ्टीमध्ये देखील 19.15 अंकांची घसरण होऊन सध्या निफ्टी 24565.90 वर पोहोचली आहे. म्हणजे आज बाजारामध्ये काहीसे अस्थिर वातावरण दिसून येत आहे. या सगळ्या अस्थिरतेत मात्र कॅनरा बँकेच्या शेअर्सच्या किमतीत 0.26 अंकांची वाढ झाली असून आजचा दिवस कॅनरा बँकेच्या गुंतवणूकदारांसाठी समाधानकारक असल्याचे दिसून येत आहे.
कॅनरा बँकेच्या शेअरची काय आहे सद्यस्थिती?
आज मंगळवारी कॅनरा बँकेच्या शेअरची कामगिरी बघितली तर ती काहीशी समाधानकारक असून अगदी सुरुवातीपासून या बँकेच्या शेअर्सच्या किमतीत काहीशी वाढ होताना दिसून येत आहे. सकाळी या बँकेच्या शेअरची किंमत 110 रुपये होती. परंतु आता त्यामध्ये घट झाल्याचे दिसून येत असून हा शेअर सध्या 109.74 रुपयांवर ट्रेड करत आहे. तसेच सकाळपासून तर आतापर्यंत बँकेचे शेअर 109 ते110 रुपये दरम्यान ट्रेड करत आहेत. तसेच गुंतवणूकदारांच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की 52 आठवड्यांची या शेअरच्या किमतीची उच्चांकी पातळी 119 रुपये राहिली आहे. तर नीचांकी पातळी 79 रुपये राहिली आहे.

गुंतवणूकदारांना दिलेला परतावा किती?
कॅनरा बँकेच्या शेअर्सने आतापर्यंत गुंतवणूकदारांना एक वर्ष कालावधी गुंतवणुकीवर -0.61%, सहा महिन्याच्या गुंतवणुकीवर +22.07%, तीन महिन्याच्या गुंतवणुकीवर +12.63% आणि एक महिन्याच्या गुंतवणुकीवर -1.74% इतका परतावा दिला आहे.