Credit Card Insurance: तुम्हीही क्रेडिट कार्ड वापरतात? ‘या’ क्रेडिट कार्डवर मिळतो मोफत जीवन विमा…वाचा माहिती

Published on -

Credit Card Insurance:- सध्या जर आपण बघितलं तर क्रेडिट कार्डचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आपल्याला दिसून येते. अनेक प्रकारच्या पेमेंट करिता क्रेडिट कार्डचा वापर वाढत असून जर आपण आकडेवारी बघितली तर क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. आपल्याला माहित आहे की क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जेव्हा आपण पेमेंट करतो तेव्हा तेव्हा त्यावर अनेक प्रकारच्या सवलती मिळतात तसेच कॅशबॅकचा लाभ देखील दिला जातो. इतकेच नाही तर रिवार्ड पॉईंट देखील आपल्याला मिळतात व त्यातून आर्थिक फायदा मिळत असतो. परंतु सगळ्यात महत्वाची यामधील जर कुठली बाब असेल तर ती म्हणजे अनेक क्रेडिट कार्ड कंपन्यांच्या माध्यमातून वापरकर्त्यांना जीवन विम्याचा फायदा देखील दिला जातो. चला तर मग या लेखात आपण याबद्दलचीच माहिती थोडक्यात बघू.

क्रेडिट कार्डसोबत मिळतो विम्याचा फायदा

आपल्याला माहित आहे की या ग्राहकांना जे काही क्रेडिट कार्ड जारी केले जातात ते वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून जारी केले जातात व अशा कंपन्या त्यांच्या ग्राहकांना विम्याचा लाभ देत असतात व विशेष म्हणजे याकरिता ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा विम्याचा हप्ता भरावा लागत नाही. या विम्यामध्ये एखाद्या वेळेस जर अपघात झाला तर होणाऱ्या नुकसानीसाठी देखील मदत दिली जाते. यातून मिळणाऱ्या प्रवास विम्याच्या माध्यमातून जर एखाद्याचा प्रवासादरम्यान काही नुकसान झाले तर ती भरपाई दिली जाते. यामध्ये विमान प्रवासात जर फ्लाईट रद्द झाली तर याची देखील भरपाई मिळते किंवा प्रवासादरम्यान सामान हरवले तर याची देखील भरपाई मिळते.

समजा एखाद्या क्रेडिट कार्डधारकाची नोकरी गेली तर त्याला क्रेडिट कार्डचे किमान पेमेंट भरण्याची देखील गरज नसते व यालाच बेरोजगारी विमा देखील म्हणतात. कार्डधारकाला जर काही कारणामुळे अपंगत्व आले तर त्याला किमान पेमेंट भरण्याची आवश्यकता नसते व ही सुविधा अपंगत्व विमा अंतर्गत दिली जाते. तसेच ग्राहकांना क्रेडिट कार्डचा वापर करून जर काही फसवणुक झाली तर अशा फसवणुकीच्या व्यवहारांपासून देखील संरक्षण मिळते. क्रेडिट कार्ड धारकाचा जर मृत्यू झाला तर अशाप्रसंगी क्रेडिट कार्ड सोबत मिळणारा जीवन विमा खूप फायद्याचा ठरतो. अशावेळी क्रेडिट कार्डची थकीत बिल कंपनी स्वतःच भरते व कुटुंबावर त्यामुळे कुठल्याही प्रकारचा आर्थिक बोजा येत नाही.

या क्रेडिट कार्डवर मिळतो विमा

तुम्हाला जर क्रेडिट कार्ड सोबत विमा मिळवायचा असेल तर तुम्हाला काही खास क्रेडिट कार्डचा वापर करणे गरजेचे आहे. याकरिता तुम्ही एचडीएफसी बँक रेगुलिया कार्ड, ॲक्सिस बँक प्रिव्हिलेज कार्ड, कोटक रॉयल सिग्नेचर कार्ड, इंडसइंड ऑरा कार्ड, आयसीआयसीआय बँक रुबिक्स आणि पीएनबी ईएमटी रूपे प्लॅटिनम कार्डचा वापर करू शकतात. या क्रेडिट कार्डची निवड करताना यावर मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यांचा नक्की विचार करावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe