एटीएम कार्डचा वापर कॅश हवी असेल तर त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर करतो. परंतु गेल्या चार ते पाच वर्षापासून ऑनलाइन व्यवहारांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे एटीएमचा वापर कमी होऊ लागला आहे. परंतु तरीदेखील अनेक जण रोख पैसे हवे असतील तर एटीएमचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात.
एटीएम कार्ड हे अनेक बँकांच्या माध्यमातून जारी केले जाते व त्याचे प्रकार आणि वैशिष्ट्ये देखील वेगवेगळे असतात. त्याप्रमाणे एटीएम कार्डचा वापर पैसे काढण्यासाठी केला जातो व अगदी त्या व्यतिरिक्त एटीएम कार्डच्या माध्यमातून काही महत्त्वाचे फायदे देखील मिळत असतात. त्यातील महत्त्वाचा फायदा म्हणजे एटीएम कार्डवर विमा देखील मिळतो व याची माहिती अजून बऱ्याच जणांना नसेल. यासंबंधीचीच माहिती आपण या लेखात घेऊ.
काय आहेत यासंबंधी बँकांचे महत्त्वाचे नियम?
जेव्हा बँकेच्या माध्यमातून संबंधित खातेधारकाला एटीएम कार्ड जारी केले जाते त्याच दिवसापासून खातेधारकाला अपघात विमा आणि अवेळी मृत्यू आल्यास जीवन विम्याचे कवच देखील लागू केले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याकरिता बँकांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही
किंवा कुठल्याही प्रकारच्या अतिरिक्त कागदपत्रे बँकेकडे जमा करणे गरजेचे राहत नाही. तुमच्याकडे कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड असेल व त्याचा 45 दिवसांपासून आधी कालावधी करिता खातेदारकाकडून वापर झाला असेल तर त्या कार्डवर मोफत विम्याचे संरक्षण मिळते. यामध्ये अपघात आणि जीवन विमा अशा दोन्ही प्रकारच्या विम्याचा समावेश असतो.
काय आहेत यासाठी अटी?
काही बँकांच्या माध्यमातून मात्र विम्याचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी घालण्यात आलेले आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या बँकेच्या अटी वेगवेगळ्या असू शकतात. एटीएम कार्डवर मिळणारी विमा पॉलिसी ऍक्टिव्हेट करण्याकरिता तीस दिवसात कार्डचा किमान एकदा तरी वापर होणे गरजेचे आहे अशी अट यामध्ये आहे.
तर काही बँकांच्या माध्यमातून ही अट दहा दिवसांची आहे. म्हणजे कार्ड ऍक्टिव्हेट झाल्यानंतर दहा दिवसात एटीएम कार्डच्या आधारे एक व्यवहार होणे गरजेचे आहे असे बंधन यामध्ये आहे.
किती मिळते विमा संरक्षण?
खातेधारकाने कुठल्या श्रेणीचे कार्ड घेतले आहे यानुसार विमा संरक्षणाची रक्कम निश्चित केली जात असते. त्यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर एसबीआय गोल्ड कार्ड असेल तर
या एटीएम कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांचे विमा संरक्षण तर अपघात प्रकरणांमध्ये दोन लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण या माध्यमातून मिळते. तसेच वेगवेगळ्या बँकांकडून मिळणाऱ्या विमा कव्हरच्या रकमेमध्ये बदल असतो.