पेमेंट अॅप वापरता ?

Mahesh Waghmare
Published:

४ जानेवारी २०२५ : आज जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्याने ऑनलाइन पेमेंटचे प्रमाण वाढले आहे. स्मार्टफोनच्या एका क्लिकवर अगदी काही सेकंदांत कोणालाही पैसे पाठवणे आणि रिसिव्ह करणे शक्य आहे. यासाठी गुगल पे, पेटीएम आणि फोन पे सारखे डिजिटल वॉलेट देखील उपलब्ध आहे.

ऑनलाइन पेमेंटसाठी अशा अॅप्सचा वापर केला जातो. मात्र, असे अॅप्स वापरताना काळजी न घेतल्यास मोठे नुकसान होऊ शकते. सध्या सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे एक चूक देखील तुमचे बँक खाते रिकामे करू शकते. या अॅप्सचा वापर करताना काय काळजी घ्यायला हवी त्याविषयी जाणून घेऊया…

स्क्रीन लॉक : केवळ स्मार्टफोनच नाही तर असे पेमेंट अॅप्स देखील लॉक असणे गरजेचे आहे.अनेकदा फोन हरवल्यास अथवा चोरीला गेल्यास एखादी व्यक्ती तुमचे बँक अकाउंट रिकामे करू शकते.तसेच, नाव, मोबाइल नंबर आणि जन्मतारखेचा पासवर्ड म्हणून वापर करू नये.

पिन शेअर करू नका : यूपीआय पिन कोणासोबतही शेअर करू नये. तुमचा यूपीआय पिन इतरांना माहीत असल्यास त्यात त्वरित बदल करा.

कोणत्याही लिंक्सवर क्लिक करू नका : अनेकांना पैशांचे आमिष दाखवणारे व्हॉट्सअॅप मेसेज आणि ई-मेल येतात.असा मेसेज आणि ई-मेलमधील
लिंक्सवर क्लिक करू नये.सायबर गुन्हेगार बँक कर्मचारी असल्याचा दावा करत तुमची खासगी माहिती विचारून फसवणूक करतात.

अॅपला करा अपडेट : सर्व अॅप्ससाठी वेळोवेळी अपडेट जारी केले जाते.याद्वारे अॅपमध्ये नवीन सिक्योरिटी फीचर्स जोडले जातात.त्यामुळे यूपीआय पेमेंट अॅप्सला वेळोवेळी अपडेट करा

एकापेक्षा जास्त पेमेंट अॅप्लिकेशनचा वापर टाळा : एकापेक्षा जास्त पेमेंट अॅप्सचा वापर करणे टाळायला हवे.गरज पडली तरीही नेहमी Play Store आणि App Store वरून केवळ व्हेरिफाइड अॅप्सच इंस्टॉल करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe