Post Office : सध्या बाजारात अनेक योजना आहेत. पण पोस्टाच्या योजना सर्वांमध्ये अव्वल क्रमांकावर आहेत. कारण येथे सुरक्षेसोबतच तुम्हाला जबरदस्त परतावा देखील मिळतो. आम्ही आज पोस्टाच्या अशा एका योजनेबद्दल सांगणार आहोत जी तुमहाला काही दिवसांतच करोडपती बनवेल.
या योजनेत वार्षिक 10,000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही करोडपती बनू शकता. या योजनेचे नाव पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहे. जर तुम्ही सध्या 20 वर्षांचे असाल आणि वयाच्या 40 व्या वर्षी लाखो कमावण्याचे तुमचे स्वप्न असेल. तर ही योजना तुम्हाला श्रीमंत बनवेल.
PPF योजनेतील गुंतवणूक पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेतून सुरू करता येते. तुम्ही एका आर्थिक वर्षात या योजनेत किमान 500 रुपये जमा करू शकता. तर कमाल 1.5 लाख रुपये जमा करता येतील. गुंतवणूकदार 50 रुपयांच्या गुंतवणुकीसह गुंतवणूक सुरू करू शकतात. गुंतवणुकीच्या रकमेवर कलम 80C अंतर्गत कर कपात देखील उपलब्ध आहे. आयटी कायद्यानुसार, व्याजाची रक्कम करमुक्त आहे.
पीपीएफ कराच्या ईईई श्रेणी अंतर्गत येतो. म्हणजे, योजनेत गुंतवलेल्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळेल. याशिवाय त्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कमही करमुक्त आहे. त्यामुळे दीर्घकालीन फायद्यांच्या दृष्टीने पीपीएफ गुंतवणूक चांगली मानली जाते.
पीपीएफ खात्यात पैसे काढण्यापूर्वीचा लॉक इन कालावधी ५ वर्षांचा ठेवण्यात आला आहे. म्हणजे ज्या वर्षात खाते उघडले जाते त्या वर्षानंतर या खात्यातून 5 वर्षे पैसे काढता येत नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म 2 भरून प्री-विड्रॉवल करता येईल. तथापि, 15 वर्षापूर्वी मॅच्युरिटी काढता येत नाही.