Electric Cars News : कोणत्या आहेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार?; जाणून घ्या सविस्तर

Content Team
Published:
Electric Vehicle

Electric Cars News : पेट्रोल (Petrol) डिझेल (Disel) च्या वाढत्या भावामुळे अनेक जण इलेक्ट्रिक कार किंवा इलेक्ट्रिक बाईक घेत आहेत किंवा घेण्याचा विचार करत आहेत. मात्र अनेकांना त्याबद्दल काही माहिती नसते.

गेल्या दोन वर्षांत देशात इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तथापि, अजूनही बर्‍याच लोकांना हे माहित नाही की योग्य इलेक्ट्रिक कार (Electric Car) किंवा बाइक (Electric Bike) कोणत्या प्रमाणात निवडायची?

जर, तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक आहात जे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहे, परंतु योग्य मॉडेल निवडण्यात अडचणी येत आहेत, तर काळजी करण्याची गरज नाही.

तर जाणून घ्या या चार सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार

Tata Nexon ही 2021 मध्ये देशात सर्वाधिक विक्री होणारी इलेक्ट्रिक कार होती. CY2021 मध्ये कंपनीने या कारच्या 9,111 युनिट्सची विक्री केली. Tata च्या Nexon मध्ये 30.2kWh लिथियम-आयन बॅटरी आहे, ती 129 hp पॉवर आणि 245 Nm पीक टॉर्क जनरेट करते. सिंगल चार्जिंगवर कार 312 किमी रेंज देते असा कंपनीचा दावा आहे. कारची किंमत 14.29 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.

या यादीत MG ZS कार दुसऱ्या क्रमांकावर आहे. कंपनीने गेल्या वर्षी या इलेक्ट्रिक कारच्या 2,798 युनिट्सची विक्री केली आहे. MG च्या ZS कारमध्ये 44.5kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो. यामध्ये सिंगल चार्जिंगमध्ये 419 किमी रेंज उपलब्ध आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 143 hp पॉवर आणि 353 Nm पीक टॉर्क निर्माण करते. MG ZS EV ची सध्या किंमत 21.49 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नुकतेच कारचे अपडेटेड व्हर्जन लाँच करण्यात आले आहे.

Hyundai Kona इलेक्ट्रिक कार ही देशातील पहिली लाँग-रेंज कार होती. दक्षिण कोरियाच्या कार निर्माता कंपनीने 2021 मध्ये देशात कोना इलेक्ट्रिकच्या 121 युनिट्सची विक्री केली. इलेक्ट्रिक कार 39.2kWh लिथियम-आयन बॅटरीद्वारे समर्थित आहे आणि प्रति चार्ज 452 किमीचा दावा केला आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 136 hp पॉवर आणि 395 Nm टॉर्क जनरेट करते. Hyundai Kona इलेक्ट्रिकची सध्याची एक्स-शोरूम किंमत 23.79 लाख रुपये आहे.

महिंद्रा इलेक्ट्रिकने गेल्या वर्षात देशात व्हेरिटो कारचे 49 युनिट्स विक्री केली. तथापि, सध्या कार खाजगी खरेदीदारांसाठी उपलब्ध नाही. महिंद्रा वेरिटो EV 72-व्होल्ट लिथियम-आयन बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे आणि प्रति चार्ज 110 किमी रेंज देते. त्याची इलेक्ट्रिक मोटर 41 एचपी पॉवर, 91 एनएम टॉर्क जनरेट करते. कारची किंमत सध्या 10.16 लाख रुपये आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe