खाजगी नोकरदारांनो! EPFO च्या ELI योजनेचा फायदा घेण्यासाठी 15 फेब्रुवारी पूर्वी ‘हे’ काम करा.. नाहीतर होईल मोठे नुकसान

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. EPFO ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात UAN सक्रिय करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे.

Ratnakar Ashok Patil
Published:

EPFO ELI Scheme:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचार्‍यांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. EPFO ने युनिव्हर्सल अकाउंट नंबर अर्थात UAN सक्रिय करण्यासाठी आणि बँक खाते आधारशी लिंक करण्यासाठी अंतिम मुदत 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत वाढवली आहे.

यामुळे खाजगी नोकरी करणाऱ्या कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.परंतु या मुदतीनंतर जर ही प्रक्रिया पूर्ण केली नाहीतर त्यांना सरकारच्या Employment Linked Incentive (ELI) योजनेचा लाभ मिळणार नाही.

या योजनेचे फायदे घेताना UAN सक्रिय करणे आणि बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य आहे. यापूर्वी ही मुदत 15 जानेवारी 2025 होती. पण 6 फेब्रुवारीच्या परिपत्रकानुसार ती 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

UAN चे महत्व काय?

UAN म्हणजे १२-अंकी ओळख क्रमांक जो कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF) खात्याच्या व्यवस्थापनासाठी वापरला जातो. एकदा UAN सक्रिय झाला की, कर्मचाऱ्यांना EPFO च्या ऑनलाइन सेवांचा फायदा घेता येतो. यामध्ये पीएफ खाते व्यवस्थापन, पासबुक पाहणे, पैसे काढणे,

आगाऊ रक्कम किंवा हस्तांतरणासाठी अर्ज करणे आणि दाव्यांची स्थिती तपासणे यासारख्या सेवा उपलब्ध असतात. UAN सक्रिय केल्याने कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्याची पूर्ण माहिती पाहू शकतात आणि त्यांचा निधी अधिक प्रभावीपणे व्यवस्थापित करू शकतात.

ELI योजना नेमकी काय आहे?

ELI योजनेचा उद्देश औपचारिक क्षेत्रात नोकऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी आहे. २०२४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्र सरकारने तीन विविध ELI योजना (A, B आणि C) सुरू केल्या आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्मचार्‍यांचे बँक खाते आधारशी जोडलेले असावे. कारण लाभ थेट बँक खात्यात जमा केले जातात. योजना अ अंतर्गत नव्या कर्मचार्‍यांना एका महिन्याच्या पगाराच्या स्वरूपात थेट लाभ हस्तांतरण दिले जाते.

याचे प्रमाण तीन हप्त्यांमध्ये दिले जाते आणि योजनेचा लाभ फक्त त्याच कर्मचार्‍यांना मिळतो ज्यांची EPFO मध्ये पहिल्यांदाच नोंदणी झाली आहे आणि त्यांचा मासिक पगार 1 लाखाच्या आत आहे. योजना ब मध्ये उत्पादन क्षेत्रातील नियोक्त्यांना फायदे मिळतात. जर त्यांनी 50 नवीन कर्मचार्‍यांची भरती केली असेल.

या योजनेतील लाभ चार वर्षांच्या कालावधीत दिले जातात, ज्यामध्ये प्रत्येक वर्षी पगाराच्या काही टक्क्यांची रक्कम नियोक्त्यांना प्रोत्साहन म्हणून दिली जाते.

योजनेचा फायदा त्या कर्मचार्‍यांना मिळतो, ज्यांचा मासिक पगार 1 लाखाच्या आत आहे. योजना क मध्ये सर्व क्षेत्रांतील नियोक्त्यांना अतिरिक्त रोजगार निर्माण करण्यासाठी अनुदान दिले जाते आणि सरकार 2 वर्षांपर्यंत प्रत्येक अतिरिक्त कर्मचारीसाठी 3000 प्रति महिना योगदान देते.

तुम्ही EPFO च्या सर्व सेवा वापरण्यासाठी आणि ELI योजनेचा लाभ घेण्यासाठी UAN सक्रिय करणे अनिवार्य आहे. यासाठी तुम्ही आधार आधारित OTP च्या मदतीने UAN सक्रिय करू शकता.

UAN ऍक्टिव्ह कसा कराल?

EPFO च्या सदस्य पोर्टलवर जाऊन तुम्ही “अ‍ॅक्टिव्हेट UAN” लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती, जसे की UAN, आधार क्रमांक, नाव, जन्मतारीख आणि आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर भरणे आवश्यक आहे.

एकदा या प्रक्रियेची पुष्टी झाल्यावर तुमच्या आधार लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल.ज्याचा वापर करून तुम्ही UAN सक्रिय करू शकता. सक्रिय केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पासवर्ड मिळेल आणि तुम्ही EPFO च्या डिजिटल सेवांचा उपयोग सुरू करू शकता.

यामुळे जर तुम्ही ELI योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असाल तर तुम्ही १५ फेब्रुवारीपूर्वी तुमचा UAN सक्रिय करणे आणि आधारशी लिंक केलेले बँक खाते तयार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी दिलेल्या मुदतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास तुम्हाला या योजनेचे फायदे मिळणार नाहीत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe