EPFO News:- देशातील कोट्यावधी सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ अतिशय महत्त्वाची संघटना आहे व या संघटनेच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम हा कर्मचारी आणि पेन्शनधारकांवर होत असतो. या संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी व पेन्शन धारकांच्या संबंधित असलेल्या अनेक सेवा सुविधां सुलभ करण्यासाठी कायमच प्रयत्न असल्याचे दिसून येते व याच उद्देशाने ही संघटना पेन्शन मधील वाढ तसेच विमा संरक्षण आणि पीएफ काढण्याची सुलभता यासारख्या महत्वाच्या सुविधांवर ऑक्टोबर 2025 मध्ये काही निर्णय घेण्याच्या तयारीत असून याचा कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे.
EPFO घेणार मोठे निर्णय
1- पेन्शन रकमेमध्ये होईल वाढ- दहा ते अकरा ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या बैठकीमध्ये कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय होण्याची अपेक्षा आहे व या अंतर्गत किमान मासिक पेन्शन 1000 रुपयांवरून थेट 1500 किंवा 2500 रुपये करण्याचा निर्णय होऊ शकतो. सध्या जर आपण बघितले तर देशातील जवळपास 96 टक्के पेन्शनधारकांना चार हजार पेक्षा कमी पेन्शन मिळते व ज्यामध्ये आता वाढ केली जाऊ शकते.

2- EPFO 3.0 ची सुरुवात- तसेच महत्त्वाचे म्हणजे दिवाळीच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून EPFO 3.0 लॉन्च केले जाणार आहे व त्यामुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया खूप सोपी होणार आहे. या माध्यमातून आता युपीआयच्या माध्यमातून पीएफ काढता येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारींसाठी एक डिजिटल प्लॅटफॉर्म देखील निर्माण होऊन कर्मचाऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यामध्ये आणखी सहजता येणार आहे. या अंतर्गत एक नवीन ऑनलाईन डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. कर्मचारी मोबाईल किंवा संगणकाद्वारे पीएफ शिल्लक किंवा मासिक जमा रक्कम आणि केलेल्या क्लेमची स्टेटस देखील तपासू शकणार आहेत.
3- विमा संरक्षणात वाढ- प्रत्येक ईपीएफ सदस्याला EDLI अर्थात कर्मचारी ठेव संलग्न विमा योजनेअंतर्गत सात लाख रुपयांचा मोफत विमा संरक्षण मिळते ज्याचा प्रीमियम कंपनी भरते. मिळालेल्या माहितीनुसार या विमा रकमेत ऑक्टोबर 2025 पासून वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
4- नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म- विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या नवीन डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे पीएफ संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे यात मोठी पारदर्शकता वाढणार असून प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे. तसेच पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. आता कर्मचारी आणि पेन्शन धारक एटीएम कार्ड आणि युपीआयच्या माध्यमातून पीएफचे पैसे काढू शकणार आहेत व ही सुविधा दिवाळी 2025 च्या आसपास लागू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्यामुळे आपल्याला दिसून येते की,या सर्व सुविधांमुळे आता कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांच्या बऱ्याच दिवसापासून जे काही प्रलंबित प्रश्न होते ते आता सुटणार आहेत. दिवाळी 2025 पूर्वी पीएफ काढणे तसेच पेन्शन मध्ये वाढ आणि विमा संरक्षण सारख्या सुविधा कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने त्यामुळे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप मोठा दिलासा मिळणार असून त्यांचे आर्थिक भविष्य अधिक सुरक्षित करता येणार आहे.