EPFO News: ईपीएफओने आधार कार्डच्या बाबतीत घेतला महत्त्वाचा निर्णय! ‘या’ कामाकरिता आता आधार कार्ड नसणार ग्राह्य

Ajay Patil
Published:
epfo rule

EPFO News:- आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र असून कुठल्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक असते. अनेक छोट्या-मोठ्या शासनाच्या योजनांचा लाभ तुम्हाला आधार कार्डशिवाय मिळू शकत नाही.

परंतु महत्त्वाच्या असलेल्या या आधार कार्डच्या बाबतीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून तुम्हाला जर जन्मतारखेचा पुरावा द्यायचा असेल तर त्याकरिता आता आधार कार्ड वैध असणार नाही.

 जन्मतारखेचा पुराव्याकरिता आधार कार्ड नसणार ग्राह्य

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासकीय कामांसाठी महत्त्वाचे असलेले आधार कार्ड आता जन्मतारखेच्या पुराव्या करिता ग्राह्य धरलं जाणार नाही. जन्मतारीख अपडेट करण्याच्या प्रक्रियेमध्ये आधार कार्ड यापुढे वैध मानले जाणार नसल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने म्हटले आहे.

याबाबत ईपीएफओ च्या माध्यमातून एक घोषणा करण्यात आली असून जन्मतारीख अपडेट आणि कनेक्शनकरिता आधार कार्ड आता आधार कार्ड स्वीकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. याकरिता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून एक मार्गदर्शक सूचना ईपीएफओ सदस्यांसाठी जारी करण्यात आली

असून त्यानुसार आता जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड स्वीकारले जाणार नाही. एखाद्याने जर जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधारचा वापर केला तर त्याची कागदपत्रे ही स्वीकारली जाणार नाहीत. म्हणजेच आता जन्म तारखेच्या पुराव्यातून आधार कार्ड काढून टाकण्यात आले आहे.

 जन्मतारखेच्या पुराव्यासाठी आधार ऐवजी वापरा ही कागदपत्रे

जन्मतारखेच्या पुराव्या करता आता आधार कार्ड ऐवजी पासपोर्ट, पॅन कार्ड, दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्माचा दाखला म्हणजेच बर्थ सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला किंवा मार्कशीट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, सरकारने जारी केलेल्या रहिवासी प्रमाणपत्र आणि केंद्र/ राज्य सरकारी संस्थांच्या सेवा रेकॉर्डवर आधारित प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे आता डीओबी म्हणजेच जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्ही वापरू शकतात.

महत्वाचे म्हणजे जन्मतारीख प्रमाणपत्र म्हणून किंवा जन्म तारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड आता स्वीकारले जाणार नाही. परंतु त्याचा वापर तुम्ही पत्ता आणि ओळखीचा पुरावा म्हणून करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe