EPFO Pension:- देशामध्ये मोठ्या संख्येने खाजगी क्षेत्रामध्ये देखील कर्मचारी काम करतात व त्यांची संख्या देखील खूप मोठी असल्याकारणाने आर्थिक दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाची पावले उचलली जातात. आपल्याला माहित आहे की,खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे सदस्य असतात व त्यांच्या माध्यमातून देखील पीएफ खात्यामध्ये दरमहा काही ठराविक रकमेचे योगदान दिले जाते व हीच रक्कम त्यांना पेन्शन स्वरूपात मिळते.
या सगळ्या पेन्शनचे नियमन हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओच्या माध्यमातून केली जाते. या सगळ्यांमध्ये आता देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे व या अर्थसंकल्पाकडून आता शेतकऱ्यांपासून तर कामगारांपर्यंत प्रत्येक घटकाच्या नजरा आहेत.
या अर्थसंकल्पातून कोणत्या गोष्टी मिळणार आणि कोणत्या गोष्टींमध्ये बदल होणार? याबाबत उत्सुकता लागून राहिलेली आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार 2025 च्या या अर्थसंकल्पात ईपीएफओ म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खातेधारकांसाठी देखील मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही घोषणा खाजगी क्षेत्रातील पेन्शनधारकांचे आयुष्यात बदल घडवून आणू शकते अशा स्वरूपाची असू शकते.
ईपीएफो खातेधारकांना मिळणार आनंदाची बातमी?
सध्या खाजगी कर्मचाऱ्यांना एक हजार रुपयांचे पेन्शन मिळत आहे. परंतु यामध्ये या येऊ घातलेल्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काही बदल होऊ शकतो अशी एक शक्यता आहे.या बदलानुसार खाजगी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये तब्बल 7500 पर्यंत वाढ होईल अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे.
कर्मचाऱ्यांच्या जीवनामध्ये पैशांच्या संबंधित समस्या येऊ नये याकरिता हा निर्णय अर्थसंकल्पात मांडण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर या संबंधीचा नवीन नियमाची घोषणा अर्थसंकल्पामध्ये झाली तर मात्र खाजगी क्षेत्रातील निवृत्त कर्मचाऱ्यांना एक हजार रुपये ऐवजी थेट साडेसात हजार रुपये इतकी पेन्शन मिळेल
व त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक जीवनमानात नक्कीच सुधारणा होईल.याकरिता हा निर्णय खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे आता या येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये नेमका या बाबतीत काय निर्णय घेतला जातो? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.