पीएफ खात्यातून पैसे काढले तरी मिळेल का पेन्शन? जाणून घ्या फायद्याचे नियम

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सदस्य असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता ईपीएस पेन्शन स्कीम राबवली जाते व या माध्यमातून खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा काही निश्चित योगदान पीएफ खात्यामध्ये जमा होत असते व त्यानंतर जेव्हा कर्मचाऱ्याच्या वयाची 58 किंवा 60 वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून ही रक्कम दिली जाते.

Ratnakar Ashok Patil
Updated:
pension rule

EPFO Pension Rule:- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या माध्यमातून सदस्य असलेल्या प्रत्येक कर्मचाऱ्याकरिता ईपीएस पेन्शन स्कीम राबवली जाते व या माध्यमातून खाजगी आणि सरकारी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा काही निश्चित योगदान पीएफ खात्यामध्ये जमा होत असते व त्यानंतर जेव्हा कर्मचाऱ्याच्या वयाची 58 किंवा 60 वर्षे पूर्ण होतात तेव्हा त्याला प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून ही रक्कम दिली जाते.

तसेच पीएफ खात्यामध्ये जी काही रक्कम जमा होत असते त्यातील काही रक्कम काही कारणांसाठी कर्मचाऱ्यांना म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना काढण्याची सोय देखील यामध्ये देण्यात आलेली आहे.

परंतु अशा पद्धतीने पीएफ काढणारा कर्मचारी म्हणजेच पीएफ खात्यातून पैसे काढणारा कर्मचारी जेव्हा निवृत्त होतो तेव्हा त्याला पेन्शन मिळते का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे नेमके यासंबंधीचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊ.

पीएफ खात्यातून पैसे काढणाऱ्यांना रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळते का?
भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढणारे कर्मचारी ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या अखत्यारीत येत असतात आणि निवृत्तीनंतर त्यांना पेन्शन मिळते व त्यासाठी ते पात्र असतात.

परंतु याकरिता कर्मचाऱ्यांनी किमान दहा वर्ष काम करणे यामध्ये आवश्यक आहे व या कालावधीत नियमितपणे तुम्ही पीएफ खात्यात योगदान दिले असेल तर तुम्ही रिटायर झाल्यानंतर पेन्शन घेण्यास पात्र असतात. जरी तुम्ही मधल्या कालावधीमध्ये पीएफ खात्यातून काही पैसे काढले असतील तरी देखील तुम्हाला पेन्शन या माध्यमातून मिळते.

वयाची 58 वर्षे पूर्ण होण्याअगोदर तुम्ही पेन्शनसाठी क्लेम केल्यासाठीचा काय आहे नियम?
पीएफ खात्यामध्ये प्रत्येक महिन्याला मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम जमा करणे गरजेचे असते. या 12% रकमेतून 8.3% रक्कम पीएफ खात्यामध्ये जमा होते आणि 3.67% रक्कम ईपीएफ म्हणजेच पीएफ योजनेत जमा होते.

ईपीएफ योजनेमध्ये जी रक्कम जमा होते. ती रक्कम कर्मचाऱ्याच्या सेवापुर्तीनंतर किंवा मुदतपूर्तीनंतर पेन्शन म्हणून दिली जाते. जर एखादा कर्मचारी पन्नास वर्षाचा झाला असेल तर यावेळी देखील पेन्शनचा दावा करता येणे शक्य आहे.

परंतु नियमानुसार 58 वर्षे पूर्ण होणे यासाठी गरजेचे असते व 58 वर्ष पूर्ण होण्याआधी पेन्शनचा दावा केला तर मात्र चार टक्के यामध्ये कपात सहन करावी लागते. रिटायरमेंटनंतर ईपीएफ फंडामध्ये जी काही रक्कम जमा झालेली असते त्याच्यातील 75 टक्के रक्कम एकरकमी कर्मचाऱ्याला मिळते व 25 टक्के रक्कम महिन्याला पेन्शन स्वरूपात मिळते.

पेन्शन मिळवण्यासाठी किमान दहा वर्ष सेवा देणे गरजेचे
एखाद्या कर्मचाऱ्याने प्रत्येक महिन्याला ईपीएफओमध्ये योगदान दिले तर दहा वर्षाच्या सेवेनंतर देखील पेन्शनसाठी संबंधित कर्मचारी पात्र ठरत असतो. आपल्याला माहित आहे की,नियमानुसार पेन्शन मिळवण्यासाठी निश्चित वय 58 वर्ष आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये कर्मचाऱ्याची इच्छा असल्यास वयाच्या 50 वर्षानंतर पेन्शनचा दावा करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe