EPFO Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे म्हणजेच EPFO चे सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु अजूनही त्यांचे पैसे मिळणे बाकी आहे. अशातच जर तुम्हीही EPFO चे सदस्य असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण EPFO ने आपल्या कोट्यवधी खातेदारांना मोठी भेट दिली आहे. लवकरच PF व्याजाचे पैसे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. याबाबत EPFO कडून एक नवीन अपडेट जारी करण्यात आले आहे. जाणून घेऊयात सविस्तर.
कधी जमा होणार पैसे? जाणून घ्या
EPFO ने याबाबत माहिती दिली आहे की 2022-23 या आर्थिक वर्षासाठी खात्यात व्याजाची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. लवकरच ते जमा केले जातील. EPF खात्यातील व्याज फक्त मासिक आधारावर मोजण्यात येते. ते आर्थिक वर्षाच्या शेवटी सभासदांच्या खात्यात जमा करण्यात येते.
24 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, आर्थिक वर्ष 2022-23 साठी, पीएफ खात्यातील ठेवींवरील व्याजदर 8.10% वरून 0.05% वरून 8.15% पर्यंत वाढवले आहे. हे पैसे या महिन्यापर्यंत ६.५ कोटी ईपीएफओ सदस्यांच्या खात्यात जमा होतील. महत्त्वाचे म्हणजे 2021-22 या आर्थिक वर्षासाठी EPFO ने EPF खात्यासाठी 8.10 टक्के व्याजदर निश्चित केला.
पगारातून कापले जातात पैसे
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या बेस पे आणि महागाई भत्त्याच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करण्यात येते. यावर ती संबंधित कंपनी कर्मचार्यांच्या पीएफ खात्यात 12% रक्कम जमा करत असते. तसेच कंपनीने केलेल्या योगदानापैकी 3.67 टक्के रक्कम EPF खात्यामध्ये जाते, तर उरलेली 8.33 टक्के पेन्शन योजनेमध्ये जाते.
जाणून घ्या फायदा
आता PF च्या गणिताबद्दल बोलायचे झाले तर जर तुमच्या PF खात्यात 31 मार्च 2023 पर्यंत एकूण 10 लाख रुपये जमा असल्यास तर आतापर्यंत तुम्हाला 8.10 टक्के दराने 81,000 रुपये व्याज मिळत होते. तर दुसरीकडे, आता सरकारने पीएफचा व्याजदर 8.15 टक्के इतका केला आहे, त्यानुसार, खात्यात जमा करण्यात आलेल्या 10 लाखांवर तुम्हाला 500 रुपयांचा थेट लाभ मिळेल.