EPS Pension Calculation : खाजगी तसेच सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सेवाकाळात आणि सेवानिवृत्तीनंतर विविध लाभ दिले जातात. दरम्यान सेवानिवृत्तीनंतर कोणकोणते लाभ मिळणार याबाबत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नेहमीच विचारणा होत असते.
अशा परिस्थितीत आज आपण प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण प्रायव्हेट सेक्टर मधील EPFO सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किती पेन्शन मिळते? याचा आढावा घेणार आहोत.

खरंतर ईपीएफओ सदस्य असणाऱ्या प्रायव्हेट सेक्टर मधील कर्मचाऱ्यांना EPS म्हणजेच एम्प्लॉय पेन्शन स्कीम चा लाभ मिळतो. या अंतर्गत सेवानिवृत्तीनंतर एक निश्चित रक्कम पेन्शन म्हणून मिळते.
दरम्यान आता आपण पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला ईपीएस अंतर्गत किती पेन्शन मिळते याबाबतची माहिती पाहणार आहोत. ईपीएस पेन्शन स्कीम ही संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली पेन्शन योजना आहे.
मात्र यासाठी कर्मचारी ईपीएफओ सदस्य असणे आवश्यक आहे. ईपीएफओमध्ये कर्मचाऱ्याकडून आणि कर्मचाऱ्यांच्या कंपनीकडून ठराविक योगदान दिले जाते. कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराची 12 टक्के रक्कम यात जमा होते आणि कंपनी देखील एवढेच योगदान यामध्ये देते.
ईपीएफओ मध्ये जमा होणाऱ्या याच रकमेपैकी काही रक्कम ही पीएफ मध्ये जाते आणि काही रक्कम ईपीएस मध्ये जमा होते. ईपीएस मध्ये जमा होणाऱ्या रकमेतून मग पेन्शन धारकांना पेन्शन दिली जाते.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की कर्मचाऱ्याकडून ईपीएफओ अकाउंट मध्ये जे योगदान दिले जाते ते पूर्णतः पीएफ अकाउंट मध्ये जमा होत असते मात्र कंपनीकडून ईपीएफओ अकाउंटमध्ये जी 12% रक्कम जमा होते त्यातील 8.33% रक्कम पेन्शन साठी जाते.
आणि उर्वरित 3.67% रक्कम ईपीएफ अकाउंट मध्ये जमा होते. दहा वर्षे नोकरी करणाऱ्यांना या अंतर्गत पेन्शनचा लाभ मिळतो. दहा वर्षे नोकरी केल्यानंतर आणि अर्ली रिटायरमेंट घेणाऱ्या लोकांना 50 व्या वर्षानंतर यातून पेन्शन मिळते. मात्र ही पेन्शनची रक्कम कमी राहते. रेगुलर पेन्शन 58 वर्षानंतर मिळते.
50000 बेसिक पगार असणाऱ्याला किती मिळणार पेन्शन
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार ईपीएस पेन्शन मोजण्यासाठी जो फॉर्मुला तयार करण्यात आला आहे त्यामध्ये 50000 बेसिक पगार असो किंवा 60000 बेसिक पगार असो यात कमाल 15000 रुपये एवढाच बेसिक पगार पकडला जातो. EPS पेन्शन = (पेन्शन योग्य सॅलरी × सेवा कालावधी ) ÷ 70 हा तो फॉर्मुला आहे ज्याच्या माध्यमातून ईपीएस पेन्शन काढली जाते.
या ठिकाणी पेन्शन योग्य सॅलरी म्हणजे गेल्या बारा महिन्यांमधील सरासरी बेसिक पगार होय. आता आपण या फॉर्म्युल्यानुसार 50 हजार रुपये बेसिक पगारा असणाऱ्याला पंचवीस वर्ष सेवा दिल्यानंतर किती पेन्शन मिळू शकते याचे कॅल्क्युलेशन पाहूयात. फॉर्मुलानुसार 50,000 बेसिक पगार असणाऱ्या कर्मचाऱ्याला 25 वर्ष सेवा दिल्यानंतर वयाच्या 58 व्या वर्षानंतर (15,000 × 25 ) ÷ 70 = 5375 रुपये इतकी पेन्शन मिळणार आहे.