LIC ची भन्नाट योजना ! एकदा गुंतवणुक अन लाईफटाईम मिळणार पैसे, वाचा सविस्तर

LIC

LIC Scheme : आपल्यापैकी प्रत्येक जण भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करतोच. म्हातारपणात हाती पैसे असावेत यासाठी अनेकजण तरुणपनी गुंतवणुकीची योजना बनवतो.

तर काही लोक काही विशिष्ट गोष्ट पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक करतात. जसे की, लग्न, घर, मुलांचे शिक्षण, मुलांचे लग्न यांसारख्या विविध कारणांसाठी लोक गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतात.

दरम्यान आज आपण एलआयसीची अशी एक भन्नाट योजना जाणून घेणार आहोत जी एक उत्तम पेन्शन योजना आहे. ज्या लोकांना म्हातारपणात फिक्स पेन्शन हवी असेल अशा लोकांसाठी ही योजना खूपच खास राहणार आहे.

या एलआयसीच्या योजनेची एक विशेषता अशी आहे की इथे एकदा गुंतवणूक करावी लागेल आणि मग तुम्हाला एलआयसीच्या माध्यमातून दर महिन्याला ठराविक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे. आम्ही एलआयसीच्या ज्या योजनेबाबत बोलत आहोत ती आहे सरळ पेन्शन योजना.

सरल पेन्शन योजनेचे स्वरूप

ही एक नॉन-लिंक केलेली आणि सिंगल प्रीमियम योजना आहे. या योजनेत पती किंवा पत्नी संयुक्तपणे गुंतवणूक सुद्धा करू शकतात. तसेच एक सिंगल व्यक्ती एकट्यानेही गुंतवणूक करू शकते.

म्हणजे सिंगल आणि जॉईंट अकाउंटमध्ये या योजनेत गुंतवणूक करता येते. यामध्ये, पॉलिसी सुरू झाल्यापासून 6 महिन्यांच्या आत गुंतवणूकदार इच्छित असल्यास समर्पण करू शकतो.

सरळ पेन्शन योजनेसाठीची पात्रता

योजनेत गुंतवणूक करण्याचे किमान वय ४० वर्षे असावे.
यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी कमाल वय 80 वर्षे आहे.
यामध्ये गुंतवणूकदार संयुक्त किंवा एकल खाते देखील उघडू शकतात.
या योजनेत मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेता येते.
मासिक पेन्शनसाठी, तुम्हाला किमान 1000 रुपये गुंतवावे लागतील.
त्रैमासिक पेन्शनसाठी, तुम्हाला किमान 3000 रुपये गुंतवावे लागतील.
अर्धवार्षिक पेन्शनसाठी, तुम्हाला किमान 6000 रुपये गुंतवावे लागतील.
वार्षिक पेन्शनसाठी, किमान 12000 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
कमाल पेन्शन रकमेची मर्यादा नाही.

एवढी गुंतवणूक केल्यास मिळणार 12 हजार पेन्शन

या पेन्शन योजनेच्या कॅल्क्युलेटरनुसार, जो व्यक्ती वयाच्या 42 व्या वर्षी सरल पेन्शन योजनेत 30 लाख रुपये गुंतवेल त्याला दरमहा 12,388 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकते. म्हणजे लोकांना जेवढी पेन्शन हवी असेल तेवढी अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe