FD Interest Rate : दिवाळीपूर्वीच ‘या’ सरकारी बँकेने ग्राहकांना दिली मोठी भेट, वाचा….

Published on -

FD Interest Rate : सणासुदीच्या काळात बँकांनी आपल्या मुदत ठेव योजनांच्या व्याजदर बदल केले आहेत. काही बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करून आपल्या ग्राहकांना खुश केले आहे, तर काहींनी व्याजदरात कपात करून नाराज केले आहे. अशातच देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या एफडीच्या व्याजदरात वाढ करून लाखो ग्राहकांना खुश केले आहे. तुम्ही देखील बँक ऑफ महाराष्ट्रचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आनंदाची असेल. बँकेने मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.25% पर्यंत वाढ केली आहे.

बँकेने आपल्या अधिकृत वेबसाईटद्वारे लाखो ग्राहकांना हीआनंदाची दिली आहे. सरकारी बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 1.25% पर्यंत वाढ करून ग्राहकांना दिवाळीपूर्वी गिफ्ट दिले आहे. नवीन दर १२ ऑक्टोबरपासून लागू म्हणजे आज पासून लागू होतील असे बँक ऑफ महाराष्ट्रकडून सांगण्यात आले आहे.

बँकेने पुढे सांगितले की, व्याजदरातील वाढ एफडी आणि बँकेच्या विशेष योजनांवर लागू होईल. बँकेने सांगितले की 46 ते 90 दिवसांच्या ठेवींवर व्याजदर 1.25% ने वाढवला आहे. यामुळे व्यक्ती आणि व्यावसायिक क्षेत्रांना अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्राचे एफडीवरील व्याजदर :-

बँक एका वर्षाच्या ठेवीवर 6.50% व्याज देईल. एक वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या ठेवींसाठी व्याजदर 0.25% ने वाढवून 6.25% करण्यात आला आहे. बँकेने निवेदनात म्हटले आहे की ज्येष्ठ नागरिकांना FD वर 0.5% अतिरिक्त व्याज मिळेल. त्यांना 200 ते 400 दिवसांसाठी विशेष ठेव योजनेवर 7.% चा आकर्षक व्याजदर दिला जाईल.

बँकेचे आकर्षक व्याजदर हे अल्प-मुदतीच्या आणि दीर्घकालीन बचतकर्त्यांसाठी एक आकर्षक पर्याय बनवतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये विश्वास आणि निष्ठा वाढते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News