FD News : शेअर मार्केट मधील अस्थिरता गुंतवणुकीचा ट्रेंड बदलू पाहत आहे. गेल्या काही वर्षांपासून शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परंतु भूराजकीय तणावामुळे शेअर मार्केट प्रचंड दबावात आहे. याच सातत्याने चढ-उतार सुरू आहे आणि म्हणूनच आता शेअर मार्केट व म्युच्युअल फंड ऐवजी गुंतवणूकदार पुन्हा एकदा पारंपारिक गुंतवणुकीकडे शिफ्ट होताना दिसत आहेत.
दरम्यान जर तुम्ही ही पारंपारिक गुंतवणुकीसाठी बँकेत एफडी करण्याच्या तयारीत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. खरेतर तर या वर्षात आरबीआयने रेपो रेटमध्ये एक टक्क्यांपर्यंत कपात केली. रेपो रेट मध्ये कपात झाल्यानंतर बँकांनी सुद्धा फिक्स डिपॉझिटचे व्याज कमी केले आहे.

त्यामुळे एफडी करणाऱ्यांना आरबीआयच्या धोरणाचा फटका बसतोय. आज अशा काही बँक आहे ज्या की एफडीवर चांगले व्याज देत आहे. पोस्ट ऑफिसच्या एफडी योजनांमधून सुद्धा गुंतवणूकदारांना चांगले व्याज मिळत आहे. अशा स्थितीत आज आपण कॅनरा बँकेची एफडी योजनेबाबत माहिती जाणून घेणार आहोत.
दोन लाखाच्या गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त रिटर्न
कॅनरा बँकेत ग्राहकांना सात दिवसांपासून दहा वर्षांपर्यंत एफडी करता येते. एफडीवर ग्राहकांना 3.25 टक्क्यांपासून सात टक्के व्याजदराने रिटर्न दिले जातात. कॅनरा बँक आपल्या ग्राहकांना तीन वर्षांच्या एफडीवर चांगले व्याज देत आहे.
3 वर्षांच्या एफडी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.25 टक्के दराने व्याज दिले जाते. याच योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 6.75 टक्के दराने व्याज दिले जाते. तसेच सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 6.85% व्याजदराने रिटर्न दिले जात आहेत.
अशा स्थितीत जर तीन वर्षांच्या एफडी योजनेत सामान्य ग्राहकाने 2 लाखाची गुंतवणूक केली तर त्याला 42 हजार 682 रुपयांचे व्याज मिळणार आहे. सिनिअर सिटीजन ग्राहकांना दोन लाखाच्या गुंतवणुकीवर 44 हजार 479 रुपयांचे व्याज मिळणार आहे.
तसेच सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 45 हजार 201 रुपयांचे व्याज मिळणार आहे. थोडक्यात सामान्य ग्राहकांपेक्षा कॅनरा बँकेची तीन वर्षांची एफडी योजना सीनियर सिटीजन तसेच सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांसाठी अधिक फायद्याची ठरत आहे.
कॅनरा बँकेकडून 444 दिवसांची स्पेशल एफडी योजना सुद्धा सुरू करण्यात आली आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या सामान्य ग्राहकांना 6.50%, सीनियर सिटीजन ग्राहकांना सात टक्के व सुपर सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.10% दराने व्याज दिले जाते.