‘या’ 8 बँका FD करणाऱ्यांना देतात सर्वाधिक रिटर्न ! 9% व्याज मिळणार 

Published on -

FD News : मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवायचा ? असा अनेकांचा प्लॅन असतो. पण हे वर्ष मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवणाऱ्यांसाठी चिंतेचे राहिले आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने या वर्षात रेपो रेटमध्ये एक टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या रेपो रेट मधील कपातीच्या निर्णयाचा फटका एफडी करणाऱ्यांना सुद्धा बसलाय.

रेपो रेट मध्ये कपात झाली असल्याने बँकांनी फिक्स रिपॉझिटचे व्याजदर सुद्धा घटवले आहे. यामुळे आता एफडी करणाऱ्यांना बँकांकडून अपेक्षित रिटर्न मिळत नसल्याची वास्तविकता आहे. हेच कारण आहे की अनेकजण एफडी ऐवजी पोस्ट ऑफिसच्या तसेच इतर सरकारी बचत योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य दाखवत आहेत.

पण देशात अशाही काही सरकारी आणि खाजगी बँक आहेत ज्या की आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी फिक्स डिपॉझिट वर चांगले व्याज ऑफर करत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला एफडीच करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला असे आठ बँकांचे पर्याय सांगणार आहोत जिथे तुमचा पैसा चांगला वाढणार आहे.

यातील एक बँक गुंतवणूकदारांना 8.75 टक्क्यांपर्यंत व्याज देते. मुदत ठेव योजनेत सर्वच वयोगटातील नागरिक गुंतवणूक करतात. पण एफ डी जेष्ठ नागरिकांसाठी अधिक फायद्याचा पर्याय ठरतो. कारण की कोणतीही सरकारी तसेच खाजगी बँक सामान्य ग्राहकांपेक्षा सिनिअर सिटीजन ग्राहकांना अधिक व्याज देते.

बँकांकडून सीनियर सिटीजन ग्राहकांना सामान्य ग्राहकांच्या 0.50% ते 0.75 टक्के अधिक व्याज दिले जाते. यामुळे ज्या सीनियर सिटीजन ग्राहकांना गुंतवणूक करायची असेल त्यांनी फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायला काही हरकत नाही.

तुम्हालाही तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावे फिक्स डिपॉझिट करायची असेल तर तुम्ही नक्कीच अधिक व्याज देणाऱ्या खाजगी तसेच सरकारी बँकांच्या एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता.

BankFD कालावधीसामान्य नागरिकजेष्ठ नागरिक
SBM2 वर्ष ते 5 वर्ष8.25%8.75%
बंधन600 Days8%8.50%
DCB36 महिने8%8.50
डॉयचे बँक2 वर्षांपेक्षा जास्त ते 3 वर्ष7.757.75
येस बँक18 महिने-36 महिने7.75%8.25%
RBL बँक24 महिने ते 36 महिने7.50%8%
IDFC First1वर्ष 1 दिवस ते 550 दिवस7.50%8%
इंडसइंड बँक 33 महिने ते 39 महिने7.50%8%
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe