या बँका देतात 365 दिवसाच्या एफबीवर सर्वाधिक व्याज! FD करण्याआधी नक्की वाचा

Published on -

FD News : मुदत ठेव योजनेत पैसा गुंतवायचा विचार असेल तर आजची बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. मुदत ठेव योजना म्हणजेच एफडी हा सुरक्षित गुंतवणुकीचा सर्वाधिक लोकप्रिय प्रकार म्हणून आजही अनेकांमध्ये लोकप्रिय आहेत. विशेषता महिलावर्ग आणि ज्येष्ठ नागरिक फिक्स डिपॉझिट मध्ये पैसा गुंतवायला अधिक प्राधान्य दाखवतात.

या वर्षात एफडी करणाऱ्यांची नक्कीच मोठी निराशा झाली आहे कारण की बँकांनी एफडी चे व्याजदर मोठ्या प्रमाणात कमी केले आहेत. कारण म्हणजे आरबीआय ने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बँकांनी देखील एफडी चे व्याजदर कमी केले आहेत.

बँकांनी मुदत ठेवी योजनेचे व्याजदर घडवल्यानंतर अनेक जणांनी एफडीऐवजी आता इतर ठिकाणी गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. पण आजही असे अनेक जण आहेत ज्यांना एफडीमध्येच पैसा लावायचा आहे. तुम्ही सुद्धा त्यापैकीच एक असणार तर आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे.

आज आपण सर्वाधिक व्याज देणाऱ्या काही बँकांची माहिती पाहणार आहोत. एका वर्षाच्या एफडीवर सर्वात जास्त व्याज देणाऱ्या बँका कोणत्या आहेत याचाच आज आपण येथे आढावा घेणार आहोत. 

 या आहेत एका वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँका 

Union Bank Of India : एका वर्षासाठी एफडी करायचे असेल तर युनियन बँकेचा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकतो. ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 365 दिवसांच्या एफडीवर 6.40 टक्के व्याज देते.

त्याचवेळी सीनियर सिटीजन ग्राहकांना 6.90% व्याज मिळते. अर्थात तुमच्या घरातील जेष्ठ नागरिकांना फिक्स डिपॉझिट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर युनियन बँक तुमच्यासाठी बेस्ट राहणार आहे.

Canara Bank : या यादीत कॅनरा बँकेचा सुद्धा नंबर आहे. बँकेने सांगितल्याप्रमाणे 365 दिवसांच्या एफडीवर सामान्य ग्राहकांना 6.25 टक्के व्याज मिळते. त्याचवेळी सिनिअर सिटीजन ग्राहकांना 6.75 टक्के दराने व्याज मिळते. 

HDFC Bank : ही खाजगी क्षेत्रातील एक प्रतिष्ठित बँक आहे. या बँकेकडून आपल्या सामान्य ग्राहकांना 365 दिवसांचा एफडीवर 6.25 टक्के व्याज दिले जाते. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असल्यास 6.75 टक्के दराने व्याज मिळते.

आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा, फेडरल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पंजाब नॅशनल बँक सुद्धा आपल्या सामान्य ग्राहकांना 6.25 टक्के व्याज देते आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याज देते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe