FD News : 2025 हे वर्ष फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी फारसे उत्साहवर्धक राहिलेले नाही. या वर्षात एफडी योजनांचे व्याजदर सर्वात जास्त कमी झाले आहे. जवळपास देशातील सर्वच प्रमुख बँकांनी एफडीचे व्याजदर घटवले आहे.
सरकारी सहकारी तसेच खाजगी बँकांनी एफडी योजनांवरील व्याजदर घटवण्याचे कारण म्हणजे आरबीआय. आरबीआयने रेपो रेट मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशातील जवळपास सर्वच प्रमुख बँकांनी एफडी योजनांचे व्याजदर कमी केले असून याचा एफडी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा फटका बसतोय.

पण आजही स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा सारख्या बँक ग्राहकांसाठी विशेष योग्य योजना राबवत आहेत आणि यातून गुंतवणूकदारांना चांगले व्याज सुद्धा मिळत आहे. दरम्यान आज आपण या दोन्ही बँकांच्या स्पेशल एफडी योजनांची तुलना करणार आहोत.
एसबीआयची स्पेशल एफडी योजना कशी आहे?
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. ही बँक अमृत वर्षा स्पेशल टर्म डिपॉझिट स्कीम चालवत आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांना सद्यस्थितीला बँकेकडून 6.6% दराने व्याज दिले जात आहे. ही एफडी योजना 444 दिवसांची आहे.
अशा स्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने या स्पेशल एफडी स्कीम मध्ये पाच लाख रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच 444 दिवसांचा काळ पूर्ण झाल्यावर पाच लाख 33 हजार 826 रुपयांचे व्याज मिळणार आहे. अर्थात या बँकेत केलेल्या पाच लाखाच्या गुंतवणुकीतून 33826 रुपये व्याज म्हणून रिटर्न मिळणार आहेत.
बँक ऑफ बडोदाची एफडी योजना कशी आहे?
एसबीआय प्रमाणे, बँक ऑफ बडोदा देखील सामान्य ग्राहकांसाठी 444 दिवसांची विशेष एफडी चालवत आहे. यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना देखील बँकेकडून 6.6% दराने व्याज दिले जात आहे. म्हणजे जर यामध्ये पाच लाखांची गुंतवणूक केली तर एसबीआय प्रमाणे ही बँक सुद्धा 33826 रुपयांचे व्याज रिटर्न म्हणून देणार आहे.
कॅनरा बँकेची स्पेशल FD योजना
कॅनरा बँक सुद्धा 444 दिवसांची एफडी योजना चालवते. या स्पेशल एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना 6.5% दराने व्याज दिले जाते.
अर्थात पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मॅच्युरिटीवर म्हणजे 444 दिवसांचा काळ पूर्ण झाल्यानंतर पाच लाख 33 हजार 301 रुपये मिळतात. अर्थात 33 हजार 301 रुपये सदर गुंतवणूकदाराला व्याज म्हणून रिटर्न मिळतात.