FD Rate : PNB बँकेच्या 400 दिवसांच्या एफडीवर मिळत आहे बक्कळ व्याज, बघा नवीन व्याजदर…

Published on -

Punjab National Bank FD Rate : नवीन वर्ष सुरु होताच बँकांनी ऑफर्स आणायला सुरुवात केली आहे, नवीन वर्षात अनेक बँकांनी आपल्या एफडी दरांमध्ये वाढ करून ग्राहकांना न्यू ईयर गिफ्ट दिले आहे. अशातच पंजाब नॅशनल बँकेने देखील आपल्या एफडी व्याजदरात वाढ केली आहे.

जर तुम्ही नवीन वर्षात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. PNB बँक संध्या उत्तम परतावा ऑफर करत आहेत, येथे एफडी करून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

PNB बँकेचे एफडी वरील व्याजदर

सरकारी बँकेत एफडी करून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता. 180 दिवस ते 270 दिवसांच्या मुदत ठेवींवर, तुम्हाला 6 टक्के व्याजाचा लाभ मिळेल, पूर्वी व्याजाचा लाभ 5.5 टक्के होता.

त्याच वेळी, जर 271 दिवसांच्या आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर 6.25 टक्के व्याजाचा लाभ मिळेल, तर पूर्वी 5.80 टक्के व्याज मिळत होते. तर 400 दिवसांच्या FD वर तुम्हाला 7.25 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल. यापूर्वी ग्राहकांना 6.80 टक्के व्याजदराचा लाभ मिळत होता.

एकीकडे पंजाब नॅशनल बँकेने एफडीवरील १८० ते ४०० दिवसांपर्यंतच्या एफडी व्याजदरात वाढ केली असून, दुसरीकडे, 444 दिवसांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी ७.३५ टक्के व्याजदराचा लाभ मिळत होता, मात्र आता नवीन व्याजदरानुसार ग्राहकांना ६.८० टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांना किती मिळणार फायदा ?

जर आपण ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोललो तर 8 टक्क्यांहून अधिक व्याजाचा लाभ घेऊ शकतात. , पंजाब नॅशनल बँक ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर ४ टक्के ते ७.७५ टक्के व्याजदराचा लाभ देत आहे. तर काही एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना ४.३ ते ८.०५ टक्के व्याजाचा लाभ दिला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe