Fixed Deposit : ‘या’ बँका ज्येष्ठ नागरिकांना 3 वर्षांच्या FD वर देत आहेत जोरदार परतावा, बघा…

Sonali Shelar
Published:
Senior citizen Fixed Deposit

Senior citizen Fixed Deposit : जेष्ठ नागरिक नेहमीच सुरक्षित गुंतवणूक पर्याय निवडतात, त्यातीलच एक म्हणजे एफडी. जे गुंतवणूकदार कोणतीही जोखीम न घेता गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा पर्याय उत्तम आहे. बँका देखील जेष्ठ नागरिकांना एफडीवर सामान्य नागरिकांपेक्षा जास्त व्याजदर ऑफर करते.

अशा अनेक सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका आहेत ज्या ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. एफडी वृद्ध लोकांना आपत्कालीन निधी तयार करण्यास मदत करते. म्हणूनच मोठ्या प्रमाणात वृद्ध लोक येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच आज आम्ही अशा बँकाबद्दल सांगणार जिथे जेष्ठ नागरिकांना एफडीवर ८ टक्क्यांपेक्षा जास्त परतावा मिळत आहे.

येस बँक

येस बँक आणि इंडसइंड बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ८ टक्के व्याज देत आहेत. हे खाजगी बँकांमध्ये सर्वोत्तम व्याजदर देत आहे. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.27 लाख रुपये होईल.

बँक ऑफ बडोदा

बँक ऑफ बडोदा ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर ७.७५ टक्के व्याज देत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील हे सर्वोत्तम व्याजदर आहेत. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.26 लाख रुपयांवर पोहोचते.

अ‍ॅक्सिस बँक

अ‍ॅक्सिस बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या FD वर 7.60 टक्के व्याज देत आहे. तुमची 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

फेडरल बँक

फेडरल बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर ७.१० टक्के व्याज देत आहे. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.24 लाख रुपये होईल.

एचडीएफसी बँक

HDFC बँक, ICICI बँक आणि पंजाब नॅशनल बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या FD वर 7.50 टक्के व्याज देतात. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.25 लाख रुपये होईल.

बँक ऑफ इंडिया

बँक ऑफ इंडिया ज्येष्ठ नागरिकांसाठी तीन वर्षांच्या एफडीवर ७.२५ टक्के व्याज देत आहे. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.24 लाख रुपये होईल.

कॅनरा बँक

कॅनरा बँक ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या एफडीवर ७.३० टक्के व्याज देते. 1 लाख रुपयांची गुंतवणूक तीन वर्षांत 1.24 लाख रुपये होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe